रायगडाची नांवे
राजाभिषेक
रायगड शकावली
अक्षांस रेखांश, समुद्रसपाटीपासून उंची
रायगडावरील खळगे व त्यांचा पहारा
रायगडाच्या घेऱ्यातील मेटे
रायगडाच्या घेऱ्यातील गावे
रायगडावरील तोफांची नावे
रायगडाचे अठरा कारखाने
रायगडाचे बारा महाल
राजाभिषेकासमयीचे अष्टप्रधान मंडळ
रायगडाच्या कुल साहित्याच्या वैभवाची बितपसील यादी
महाराजांशी व रायगडाशी परिचित परकीय प्रवासी


११ वे शतक  - यादवांची सत्ता गडावर मराठे पाळेगार.
१२ वे शतक  - मराठे पाळेगारांनी विजयनगर अथवा. अनागोंदीचे स्वामित्व स्विकारले.
इ.स. १४३६ - अल्लाउद्दीन शहा बहामनी २रा याचे मराठे पाळेगारांनी स्वामित्व स्विकारले.
इ.स. १४७९ - अहमद नगरच्या निजामशहाकडे गड ताब्यात शिर्के येथील देशमुख.
इ.स. १५५८ - अदिलशहाची अधिसत्ता.
इ.स. १६१७ - निजामशाही अधिकारी म्हणून आागा हाजी याकुद इस्तंबोली हा हवालदार.
इ.स. १६१८ - आदिलशाहीच्यावतीने हैबतखानाचा रायरीवर हल्ला, लुट व सबंध खोरे काबीज, हवालदारी राजे पतंगराव याजकडे.
इ.स. १६२१ - राजे पतंगराव यांची बदली होवुन मलिक जमरुत गडाचा हवालदार.
इ.स. १६२४ - निजामशाही अधिकारी म्हणून इब्राहिमखान हा रायरीचा व बारा मावळांचा हवालदार.
६ मे १६३६  - बादशहा शहाजहान याची निजामशाहीवर स्वारी व विजय, मोगल राजधानी पासून दुर असलेला हा अवघड मुलूख सांभाळणे कठीण म्हणून अदिल शहाशी तह. रायरीचा प्रत्यक्ष ताबा चंद्रराव मोऱ्यांकडे.
६ मे १६५६  - शिवरायांनी रायरी जिंकला.
४ सप्टेंबर १६५६   - रायरी हे नांव बदलू रायगड हे नामकरण.
इ.स. १६५७-५८    - आबाजी सोनदेव व रामराव प्रभू यांची नेमणूक
११ डिसेंबर १६६७   - पोर्तुगीज वकील गोंझालो मार्टिनशी वाटाघाटी.
इ.स. १६७० - गडाची दुरुस्ती, व नवीन बांधकाम महाराजांचे कायमस्वरुपी वास्तव्य.
मे १६७२   - इंग्रज वकील उस्टिक रायगडावर.
२१ जुलै १६७२    - डच वकील आब्राहम लेपेकर रायगडावर.
३ जून १६७३  - इंग्रज वकील थॉमस निकल्स रायगडावर.
२२ मे १६७४  - हेन्री ऑक्झेंडनचे आगमन व १३ जुन पर्यंत मुक्काम
२९ मे १६७४  - महाराजांची समंत्रक मुंज.
३० मे १६७४  - सोयराबाई साहेबांशी समंत्रक विवाह.
६ जून १६७४  - जेष्ठ शु. १३ शिवराज्याभिषेक.
१७ जून १६७४  - राजमाता जिजाऊसाहेबांचे पाचाड येथे निधन.
२४ सप्टेंबर १६७४ - अश्विन शु. ५ (ललितापचंमी) दुसरा राज्याभिषेक
२४ सप्टेंबर १६७५ - इंग्रजवकील सॅम्युअल ऑस्टिन गडावर.
७ सप्टेंबर १६७५   - राजाराम साहेबांची मुंज.
१५ मार्च १६८०     - राजाराम साहेबांचे लग्न.
३ एप्रिल १६८०     -  महाराजांचे महाप्रस्थान.
२१ एप्रिल १६८०    - राजाराम साहेबांचे मंचकारोहण.
१८ जून १६८०   - संभाजी राजांचे पन्हाळयाहून आगमन.
२७ जून १६८०  - शिवपत्नी पुतळाबाई साहेब सती.
२० जुलै १६८०    - संभाजी राजांचे मंचकारोहण.
२७ ऑक्टोबर १६८०   - मोरोपंत पिंगळे यांचे देहावसन.
१६ फेब्रुवारी १६८१   - संभाजी राजांचा विधियुक्त राज्याभिषेक.
ऑगस्ट १६८१   - संभाजी राजांवर विषप्रयोगाचा प्रयत्न.
९ फेब्रुवारी१६८१    - राजाराम महाराजांचे मंचकारोहण.
२५ मार्च १६८९     - झुल्फिकार खानाचा रायगडाला वेढा.
५ एप्रिल १६८९     - राजाराम महाराज रायगडावरुन निसटले.
३ नोव्हेंबर १६८९   - गड मोगल्यांच्या हाती - इस्लामाबाद नामकरण.
इ.स. १६९० - मोगलांतर्फे गडाचा ताबा सिद्दीकडे.
६ जून १७३३   - रायगड पेशव्यांनी घेतला, ताबा पंतप्रतिनिधींकडे.
१८ मार्च १७७३    - रायगड पेशव्यांच्या ताब्यात.
जून १७९६  - नाना फडणविसांचा मुक्काम व गडाची डागडुजी.
इ.स. १८०२ - दुसऱ्या बाजीरावाचे गडावर वास्तव्य.
२ फेब्रुवारी १८१०   - रायगड-माची येथे दुसऱ्या बाजीरावाचा मुक्काम.
इ.स. १८१६    - रायगड इंग्रजांकडे परंतु लगेच त्याचा ताबा पेशव्यांकडे, पेशवे गड सोडिनाच.
२५ एप्रिल १८१८   - इंग्रजांचा रायगडाला वेढा.
४ मे १८१८  - खुब लढयावर इंग्रजांचा भडिमार.
६ मे १८१८   - पोटल्याच्या डोंगराकडून केलेल्या भडिमाराने गडावर जाळपोळ.
१० मे १८१८   - रायगडावरील स्वातंत्र्यसुर्य मावळला तह होवुन गड इंग्रजांकडे.

Site Designed and Maintain by Net Solutions