रायगडाची नांवे
राजाभिषेक
रायगड शकावली
अक्षांस रेखांश, समुद्रसपाटीपासून उंची
रायगडावरील खळगे व त्यांचा पहारा
रायगडाच्या घेऱ्यातील मेटे
रायगडाच्या घेऱ्यातील गावे
रायगडावरील तोफांची नावे
रायगडाचे अठरा कारखाने
रायगडाचे बारा महाल
राजाभिषेकासमयीचे अष्टप्रधान मंडळ
रायगडाच्या कुल साहित्याच्या वैभवाची बितपसील यादी
महाराजांशी व रायगडाशी परिचित परकीय प्रवासी


हेन्री ऑक्झेंड्न हा इंग्रजांचा वकिल सुरतेच्या प्रसिडेंट जॉर्ज ऑक्झेंडनचा नातलग कारवारच्या वखारीचा प्रमुख होता. महाराजांनी कारवार जिंकले तेव्हांचा हा परिचय हाच हेन्री  ऑक्झेंडन रायगडावर राज्याभिषेकाच्यावेळी हजर होता. त्याच्या बरोबर जॉर्ज रॉबिन्सन, थॉमस मिचेल, आणि नारायण शेणवी हा दुभाषा आले होते. पुढे सन १६७५ मध्ये सॅम्युअल ऑस्टीन हा वकिल महाराजांच्या दरबारी आढळतो. सन १६७६ मध्ये मौलवेअरने रायगडास इंग्रजांतर्फे वकिली करण्यास भेट दिली. संभाजी राजांच्या आमदानीत कॅप्टन गेरी व लेफ्टनंट विल्किन्स आणि नंतर बहूधा केग्विन याने रायगडाला भेट दिली. केनेडी, डग्लस, मेजर हॉल, कर्नल प्रॉथर, लेफ्टनंट क्रॉसबी, लेफ्टनंट रेमन, एन्साइन्स जॅप, डॅशवूड, मेजर बाँन्ड या इंग्रजांनी रायगडास भेटी दिल्याचा उल्लेख आढळतो, हेन्री रेव्ंहिगटन तर शिवकालात कैदी म्हणून वास्तव्यास होता. पोर्तुगीज वकिल गोंझालो मार्टिन आणि डच वकिल अब्राहम लेपेकर यांच्या रायगडवारी बद्दल माहिती उपलब्ध असून मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल, रेव्हेन्यू, कमिशनर क्रॉफर्ड कॅप्टन पिट, जेम्स डग्लस या मंडळीच्या भेटी तर उल्लेखनीय आहेत.

 
Site Designed and Maintain by Net Solutions