शिवराजाभिषेक
  मुडस् ऑफ रायगडच्या निमित्ताने
  मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली
  धर्मरक्षक - राजा शिवाजी
  शिवरायांचा समकालीन गणिती
  आईसाहेबांची सुवर्णतुला
  रायगड परिक्रमा
  छत्रपति शिवाजी महाराजांची नाणी
  रायगड
  संक्षिप्त रायगड
  भट्ट घराणे
  श्रीशिवराजाभिषेक सुमुहूर्त पाऊसाळयांत कां धरिला?
  शिवराज भूषण
  छत्रपति शिवाजी महाराज व भवानी माता वरप्रदान
  राजधानी रायगडाच्या बांधणीतील काही अभिनव वैज्ञानिक प्रयोग
  किल्ले रायगडावर प्रकाशित झालेली पुस्तके
  ‘गनिमीकावा’ या युध्दशास्त्राचे अनमोल उदाहरण “प्रतापगड युध्द”
  मंचकारोहण आणि सिंहसनारोहण
  शिवराजाभिषेक कारण, कार्य, भाव
  शिवराजाभिषेक समयास उपस्थित ब्रह्मवृंद
  राज्याभिषेक
  मराठा राजघराण्याची नाणी
  पहिला श्रीशिवराजाभिषेक
पहिला श्रीशिवराजाभिषेक
सौ. शिल्पा परब - प्रधान

शके 1577 मन्मथ संवछरी राजश्री सिवाजी राणे यानी पौष चतुर्दतीस जाऊन जावली घेतली. शके 1578, दुमुर्ख संवछर वैशाखमासी राजश्री सिवजी राजे यानी रायरी घेतली समागने कान्होजी जेधे देशमुख तालुका भोर व बांदल व सिलिंबकर देशमुख व मावळचा जमाव होता, हेबतराऊ व बालाजी नाइक सिलिंबकर याणी मध्यस्ती करुन चंदरराऊ किलियाखाली उतरले, असे जेधे शकावली सांगते.
शके 1577 मन्मथ सवछरी पौष्य शुध चतुर्दस राजश्री सिवाजी जाऊन जाऊली घेतली चंदरराऊ पळोन राइरीस गेले, तेथे राजश्री स्वामीनी किलीयास वेढा घातला बरोबर कान्होजी नाईक व जमाव व वरकडा देशमुखांचा जमाव होता ते समई हैबतराऊ सिलिंबकर देशमुख तालुका गुंजणमावळ यांणी मध्यस्ती करुन चंदरराऊस भेटविले. असे जेधे यांचा करीना सांगतो.

31 डिसेंबर 1655 महाराज किल्ले पुरंदरावरुन जावळीवर निघाले. मंगळवार दिनांक 15 ज़ानेवारी 1656 महाराजांनी जावळी घेतली. 30 मार्च 1656 पर्यंत महाराज जावळी मुलुखांत होते. 15 एप्रिल 1656 ते 14 मे 1656 या कालावधीत महाराजांनी रायरी घेतला. जावळी मुलुखावर महाराज चालून आले त्याला निरनिराळी कारणे आहेत. त्याबाबत मोरे घराण्याची बखर सांगते महाराजांनी चंद्ररावास लिहिले -

“तुम्ही मुस्तफद राजे म्हणवितां, राजे आम्ही आम्हांस श्रीशंभूने राज्य दिधले आहे, तर तुम्ही राजे न म्हणावे. आमचे नोकर होऊन आपला मुलुक खाऊन हामराहा चाकरी करावी. नाहीतर बदफैल करुन फंद कराल, तर जावली मारुन तुम्हास कैद करुन ठेवू”
उत्तरादाखल चंद्ररावाने महाराजांस लिहिले की, “तुम्ही काल राजे जाहला. तुम्हांस राज्य कोणे दिधले? मुस्तफद राजा आपले घरी म्हटलीयावर कोण मानितो? येता जावली जाता गोवली पुढे एक मनुष्य जीवंत जाणार नाही. तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला तर, उदईक याल तर आजच यावे - आम्ही कोंकणचे राजे असून आमचा राजा श्रीमहाबलेश्वर. त्याचे कृपेने राज्य करितो आम्हा श्रीचे कृपेने पादशाहाने राजे किताब, मोरचले, सिंहासन मेहरेबान होऊन दिधले. आम्ही दाईमदारी दरपिढी राज्य जावलीचे करतो. तुम्ही आम्हांसी खटपट कराल तर पष्ट समजून करणे आणखी वरकड मजकूर तुम्हांस आहे. येथे उपाय कराल तर तो अपाय होईल. यश घेता अपयशास पात्र होऊन जाल.”
चंद्रराव मोऱ्याचे उत्तर ऐकून संतप्त झालेल्या महाराजांनी मोऱ्यांना अखेरचे पत्र लिहिले.
“जावली खाली करोन, राजे न म्हणोन, मोरचेल दूर करुन, हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजूराची काही चाकरी करणे. इतकीयावर बदफैली केलीया मारले जाल” म्हणून चंद्ररावाने महाराजांस आव्हानात्मक लिहिले. “दारूगोळी महझूद आहे. काही बेजबाबास खुते घालून लिहिले ते कासियास ल्याहाविते थोर समर्थ असो”
आणि म्हणूनच महाराजांनी जावळीवर स्वारी केली.

मोरे कुलोत्पन्न जावळीतील “आद्य चंद्रराव” राजाविषयी मोरे यांचा बखरकार सांगतो -”एकवचनी चंद्रावर हुजूर. तेव्हा चंद्रराव आडेल शिपाई, आजदादेघरचा राऊत मर्दाना,” “चंद्ररायाचे राज्य धर्माला जावलीकर राज्य करीत असता राजीयातील हिस्से एक हिसीयाची शिबंदी पायेहासम, एक हिसीयाची अन्नछत्रे व धर्म खैरात एका हिसीयाची खाजगी खर्च, तोसीखाना, पागा, सुरतखाना, अदिलखाना वगैरे, एक हिसा देवस्थली देव, शिवालये, माहाबलेश्वरी पंचगंगा चंद्ररायाही बांधल्या. ऐशा सात शिवपुऱ्या चंद्ररायाही आपले वंशपरंपरा जेथून जावलीचे राज्य जाले, तेथून संपेल तेथवर देवस्थली बाकी चालविली. ऐसे धर्मराजे मोरे जाहले”
मौर्य - मोरया (श्रीगणपति) - मुचकुंद ऋुषि- मोरे हा जावळी मुलुखाचा आद्य आधार आहे. किल्ले रायरी ते किल्ले खेळणा आणि कोयना कांठ ते सांप्रतचा मुंबई-गोवा महामार्ग हा जावळीचा आद्य मुलुख आहे. त्या मुलुखांत 1) शिवथर - यशवंतराव 2) जोर - हणमंतराव 3) जांभळी - गोविंदराव 4) महिपतगड - दौलतराव 5) केवनाळे व वाकण - बागराव 6) आटेगांव तरफेतील देवळी - सूर्यराव 7) देवळी - भिकाजीराव 8) खेळणा - शंकरराव हे आठ अनभिषिक्त मोरे घराण्यांतील आद्य राजे होते.
सावित्री नदीच्या उगमापासून मुखापर्यंत मोरे घराण्याने महाबलेश्वर, पर्वत, चकदेव, घोनसपूर, तळदेव, गाळदेव, धारदेव, मोळेश्वर, बाणकोट इत्यादी बारा शिवपुऱ्या निर्माण केल्या. जावळीप्रांतात जांभूळखोरे, जोरखोरे, शिवथरखोरे, कांदाटखोरे, ताजमहाल, बामणोली, चतुर्बेट, सोलसखोरे, इ. 18 महाल होते. जावळी मुलखात पारघाट, कोंडेनळी घाट, रडतोंडी घाट, ढवळाघाट, हातलोटचा घाट, सापळाखिंड, कावल्या-बावल्या, अन्नछत्राची नाळ, बोराटयाची नाळ, वरंधा-घाट, आंबेनळीघाट इ. सुमारे 60-62 घाट होते. जावळी मुलखात किल्ले रायगड, लिंगाणा, चंद्रगड, खेळणा, कांगोरी, कावळया, मकरंदगड, सोनगड, चांभारगड, महिपतगड, प्रतापगड (भोरप्या), रसाळगड, सुमारगड, जननीदुर्ग, वासोटा इ. किल्ले होते.

किल्ले महिपतगडचा दौलतराव हा चंद्रराव बिरुद धारण करुन होता. तो निपुत्रक निधन पावल्यावर त्याची धर्मपत्नी माणकाई हिने शिवथरचा यशवंतराव मोरे याला दत्तक घेऊन आपल्या घराण्यात चंद्रराव बिरूद राखले. हाच यशवंतराव शिवरायांशी गैरवर्तन करता उरला म्हणून शिवरायांनी जावळी मुलुखावर स्वारी केली आणि म्हणूनच तो विस्तीर्ण मुलुख जिंकल्यावर तो स्थिरस्थावर करण्यास शिवरायांना एवढा प्रदीर्घ कालावधी लागला. सकळकळेकृत “शिवकाव्य” या पोथीतील सर्ग 5 मधील श्लोक 53 सांगतो की, “शिवरायांनी सह्याद्री पायथ्याचा मुलुखात प्रवेश करुन तेथे गुप्तपणे व घाईघाईने (ंगंधर्व पध्दती) ”जयश्री”नावाच्या तरुणीचे पाणिग्रहण हि तरुणी शंकरराय मोरे कुलोत्पन्न, विचारवंत उपकुळ, “विचारे” घराण्यातील होती. हिचे माहेरचे नाव “जयश्री” आणि सासरचे नाव “लक्ष्मीबाई” असे होते याला इतिहासाची साक्ष आहे”

पुढे सर्ग 6 मधील श्लोक क्र. 1 सांगतो की राज्ञी जयश्रीसहित शिवाजीराजे स्वस्तयन करुन मंगल वाद्य घोषात स्वत:चे नगराकडे निघाले. त्याच सर्गात उल्लेख आहे की, शिवरायांना गजदानाची इच्छा झाली सकळकळ ब्राहमण याने चंद्रमाला नदीच्या किनारी यज्ञमंडप उभारला यज्ञाचे वेळी इन्द्रादि देवतांना आवाहन केले. संक्राती “प्रथम दिवशी” पुण्याहवाचन, दुसरे दिवशी धनदान व यज्ञसमाप्तीच्या वेळी ब्राह्मणांनी शिवाजी राजांस सुवर्णकुंभात भरलेल्या गंगोदकाने “राजाभिषेक” केला व दान केल्याचे उल्लेख आहेत.
यावरुन शिवरायांनी मोरे उपकुळ विचारे कुलोत्पन्न शिवराज्ञी जयश्री उर्फ लक्ष्मीबाई हिच्यासह आपणांस जावळीमध्ये 14 जानेवारी 1656 रोजी मकरसंक्रमणच्या मुहूर्तावर राजाभिषेक विधी सुरु करुन पंडित सकळकळे ब्राह्मण गुरुच्या हस्ते राजाभिषेक करवून घेतला आणि जावळी मुलखात घोषित केले. की यापुढे जावळी मुलखाचे राजे चंद्रराव मोरे नसून शिवाजी महाराज राजे आहेत. या राजाभिषेकाने जावळीच्या प्रजाजनांस महाराजांनी सत्ताबदल झाल्याचे दर्शवून दिले. त्यामुळेच मोऱ्यांचे सेनापती मुरारबाजी आपल्या चार बंधुसह आणि तान्हाजी मालुसरे आपल्या सूर्याजी बंधूसह तसेच काही मराठा घराणी आपल्या सैन्यासह शिवसैन्यात सामील झाली.

किल्ले रायगडावर मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी जावळी मुलुखाचे अधिपत्य प्रस्थापित करण्यासाठी आपला पहिला ‘श्रीशिवराजाभिषेक’ संपन्न व विस्तीर्ण जावळीचा राज्यकर्ता चंद्रराव याला नमवून त्याचे राज्य जिंकल्यावर 1656 मध्ये मकरसंक्रमणाच्या काळात करवून घेतलेला दिसतो.

Site Designed and Maintain by Net Solutions