शिवराजाभिषेक
  मुडस् ऑफ रायगडच्या निमित्ताने
  मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली
  धर्मरक्षक - राजा शिवाजी
  शिवरायांचा समकालीन गणिती
  आईसाहेबांची सुवर्णतुला
  रायगड परिक्रमा
  छत्रपति शिवाजी महाराजांची नाणी
  रायगड
  संक्षिप्त रायगड
  भट्ट घराणे
  श्रीशिवराजाभिषेक सुमुहूर्त पाऊसाळयांत कां धरिला?
  शिवराज भूषण
  छत्रपति शिवाजी महाराज व भवानी माता वरप्रदान
  राजधानी रायगडाच्या बांधणीतील काही अभिनव वैज्ञानिक प्रयोग
  किल्ले रायगडावर प्रकाशित झालेली पुस्तके
  ‘गनिमीकावा’ या युध्दशास्त्राचे अनमोल उदाहरण “प्रतापगड युध्द”
  मंचकारोहण आणि सिंहसनारोहण
  शिवराजाभिषेक कारण, कार्य, भाव
  शिवराजाभिषेक समयास उपस्थित ब्रह्मवृंद
  राज्याभिषेक
  मराठा राजघराण्याची नाणी
  पहिला श्रीशिवराजाभिषेक
शिवराजाभिषेक समयास उपस्थित ब्रह्मवृंद
श्री. आप्पा परब

शिवकालीन निर्देशित उपलब्ध निरनिराळया ऐतिहासिक लिखित साधनांतून शिवराजाभिषेक प्रसंगी २ हजार ते २० हजार बटु - स्त्री - पुरूष ब्रह्मवृंद किल्ले रायगडच्या आसमंतांत जमला होता.

यांतील अतिशयोक्ति नाकारून आणि पर्जन्य काळाचे दिवस लक्ष्यांत घेऊन आणि तत्कालीन वहातुकीच्या साधनांचा अभाव लक्ष्यांत घेऊन ही ब्रह्मवृंद बटु - स्त्री - पुरूष संख्या २ हजार असावी.

शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळांतील न्यायाधीश निराजी रावजी याच्या हाताखाली कृष्णाजी अनंत हिरेपारखी उर्फ सभासद म्हणजे न्यायालयांतील फिर्यादीची दखल करून घेणारा कारकून इसवी सन १६६८ पासून कार्यरत होता. हा आद्य शिवचरित्र बखर लेखक वास्तविक किल्ले रायगडवरील घटनांचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. त्यानं लिहिलेल्या ‘सभासद बखर’ या आद्य शिवचरित्रांतर्गत कळत - नकळत कांही लिखाणांत त्याची विस्मृति जाणवते. तो आपल्या बखरींत सांगतो -

उपाध्ये प्रभाकर भटाचे पुत्र बाळंभट कुलगुरू व भट गोसावी, वरकट श्रेष्ठ भट व सत्पुरूष अनुष्ठित (म्हणजे विधिपूर्वक धर्मकृत्य करणारे) यांची सर्वांची पूजा यथाविधी अलंकार, वस्त्रे देऊन (केली). सर्वांस नमन करून (शिवराय) अभिषेकास सुवर्ण चौकी (चौरंगा)वर बसले.

कागदींपत्रीं स्वस्तिश्री (राजाभिषेक) शक, सिंहासनावर बसले त्या दिवसापासून नियत (नियमित) चालविला. पन्नास सहस्त्र ब्राह्मण वैदिक मिळाले, या वेगळे तपोनिधी व सत्पुरूष, संन्यासी, अतिथी, मानभाव, जटाधारी, जोउलफे (शिधा) चालविले. निरोप देतां पात्र पाहून द्रव्य, अलंकार, भूषणें, वस्त्रें अमर्याद दिधलीं.

त्यापैकीं शुचिष्मंत निरनिराळया शुचिर्भूत कार्यास्तव पांचशें स्त्री - पुरूष ब्रह्मवृंद किल्ले रायगडवर आला होता.

किल्ले रायगडवर पूजा - पाठादि नित्य कार्यास्तव कायमस्वरूपी वास्तव्यास असलेली ब्राह्मण कुटुंबे राजपथावरील ‘हुजूरबाजार’ अंती उजवीकडील आग्नेय दिशेस ब्राह्मण वसाहतींतील घरांघरांत राहत होतीं. तसेंच शासकीय ब्राह्मण सल्लागार, हुजूरबाजार महाजन बाबाजीनाईक पुंडे कुटुंबिय इत्यादि ज्येष्ठ - श्रेष्ठ ब्राह्मण किल्ले रायगडवरील बालेकिल्ल्याच्या आग्नेय आसमंतांतील वाडे समूहांत पवित्र जलाशय ‘कुशावर्त’ तीर्थ होता. नाशिक सदृश्य कुशावर्त तीर्थ जलाशयाच्या कांठावरील आणि त्या जेष्ठ - श्रेष्ठ ब्रह्मवृंदांच्या ‘वाडे’ परिसरांतील ‘त्या’ शिवदैवतास ‘वाडेश्वर’ नामाभिधान होतें.

शिवरायांचे राजपुरोहित प्रभाकर भट्ट आपल्या धर्मपत्नीसह किल्ले रायगडवरील पवित्र कुशावर्त तिर्थाच्या कांठावरील श्रीदेववाडेश्वर मंदिराच्या वायव्य दिशेकडील वाडयांत राहात होते. त्यांच्या पडलेल्या घराची घरठा म्हजे ओसाड जागा सांप्रतहि दृश्यमान आहे.

प्रभाकर भट्ट. शके १५४०च्या पत्रांत यांचाय प्रथम उल्लेख त्यांजकडे जमीन चालविण्याबद्दलचा आहे. त्यावेळीं ते आर्वीकडे राहत असत. पुढे शहाजीराजे यांचे बरोबर प्रभाकर भट्ट कर्नाटकांत गेले. तेथें शहाजीराजांकडे विद्वान लोक येत. त्यांच्या दाद लावून त्यांच्या योग्य परामर्श घेणे. हें काम त्यांचेकडे होते. शहाजीराजे यानां स्वप्नांत दृष्टांत झाला. तें स्वप्न त्यानीं प्रभाकर भट्ट यांस सांगितले. त्यांच्या अनुमोदनानें शहाजीराजानीं शिवरायांची रवानगी पुण्याकडे केली. प्रभाकर भट्ट शिवरायांसोबत पुण्यास आले.

प्रभाकर भट्ट इसवी सन १६७० पर्यंत किल्ले राजगडवर वास्तव्यास होते. किल्ले राजगडवर ते पद्मावती माचीवर देवी पद्मावती मंदिराच्या उत्तरेस व पद्मावती तलावाच्या पश्चिमेस सांप्रत जो उत्सखनीत घराचा चौथरा दिसतो, तेथें राहात होते. शिवरायांचे पुरोहित असल्यामुळें श्रीदेवी पद्मावती, श्रीमहादेव व दिवाण-इ-आम लगतच्या देवघरांतील पूजा-अर्चा, अभिषेक, कथा-किर्तन करण्यास त्यानां सोयिस्कर होतें.

सन १६७१ नंतर किल्ले रायरीचा किल्ले रायगड आकारास आल्यावर सर्व शासकीय, लष्करी, मजालसी अधिकाऱ्यांसमवेत पुरोहित प्रभाकर भट्ट किल्ले रायगडवर आले आणि उपरोक्त वास्तुंत वास्तव्यास राहिले. राजधानी बनललेल्या किल्ले रायगडवर पूजापाठाचा व्याप विस्तृत झाला होता. राजवाडयांतील ‘भवानीहुडा’ श्रीदेवीमहिषासुरमर्दिनी शिर्काई मंदिर, श्रीदेववाडेश्वर, श्रीदेवजगदिश्वर आदि दैनंदिन पूजेची ठिकाणें दूरदूर होती. वार्धक्यप्राप्त प्रभाकर भट्टानां तीं कामें आतां आटोपण्यासारखी नव्हती. प्रभाकर भट्ट विना अपत्य होते. त्यानीं बाळंभटांना हाताखाली घेतलें. तरूण बाळंभट्ट त्याच तोलामोलाचे होते. ते कामाचा व्याप सांभाळू लागले. ते प्रभाकर भट्ट यांचे उत्तराधिकारी झाले. इसवी सन १६७३ मध्यें एक दिवसीं किल्ले रायगडवर प्रभाकर भट्ट यांचे निधन झाले. त्यांची धर्मपत्नी बाळंभट्टांची धर्ममाता झाली. आपल्या पुढील चरीतार्थाची सोय कायदेशीर असावी, म्हणून दुःखातून सावरल्यावर, इसवीसन १६७४ मध्ये शिवराजाभिषेक समारंभ संपल्यावर मीति सातवाहन शके १५९६ आनंदनाम संवत्सर आषाढ शुध्द एकादशी या दिवसीं शिवराजाभिषेक समयास उपस्थित ब्रह्मवृंदपैकी कांही ब्रह्मवृंद बोलावून दत्तक विधान पत्र लिहून घेतले; व त्यांच्या साक्षी घेतल्या. बाळंभट नक्की प्रभाकर भट्टांच्या हाताखाली कधी आले, हें पुढील बखरींतील उल्लेखाच्या आधारें ठरवितां येते.

सभासद बखरकार म्हणतो - पुढें सुर्वे राज्य करीत होते. त्यांजवर (इसवी सन १६६१ मध्यें शिवराय) चालून गलें. शृंगारपूर घेतलें. सुर्वे पळोन देशांतरास गेले. त्यांचे कारभारी शिर्के होते. त्यांचे पुत्र बाळंभट व गोविंदभट उपाध्येपण चालवित होते.

चिटणीस बखरकार सांगतो - राजापूरची स्वारी होऊन देश - दुर्ग फत्ते करून (इसवी सन १६६१) मध्यें शिवराय राजगडास आले. प्रभाकर उपाध्ये यांचे पुत्र बाळंभट व गोविंदभट जवळ ठेऊन उपाधिक परंपरागत त्यांचे स्वाधिन केलें.

यावरून सूर्यराव सुर्वे यांचे शृंगारपूर राज्य जिंकल्यानंतर त्यांचे दिवाण पिलाजी शिर्के शिवरायांकडे वकिलीस आले. त्यावेळीं व नंतर त्यांच्या प्रातांतील कोकणांतील कांही ब्राह्ण शिवरायांकडे आश्रयार्थ आले व राहीले. त्यांतच ‘बाळंभट’ कोकणांतून आले. किल्ले राजगडावर प्रभाकर भट्ट यांच्या हाताखालीं बाळंभट पूजापाठादि नित्यकर्ास राहीले. गोविंदभटही आले, पण ते पुढे कर्नाटकांत गेले. बखरींतून जरी या दोघांचा प्रभाकरभट्ट यांचे पुत्र म्हणून उल्लेख केलेला असला तरी पुढील दत्तक विधान पत्रानुसार ते दोघेही औरस पुत्र नव्हेत. प्रभाकर भट्ट यांचे बाळंभट औरस पुत्र असल्यास दत्तकपत्राची आवश्यकता नव्हती. वडिलांच्या निधनोत्तर आपल्या जन्मजात मातेचे पालनपोषण करण्याचें धर्मकर्तव्य बाळंभटानीं टाळले नसते. परंतु किल्ले रायगडवीरल उपस्थित कांही ब्रह्मवृदांच्या सल्ल्यानुसार प्रभाकर भट्ट यांच्या धर्मपत्नीने कायदेशीर धर्मबंधन बाळंभटास घालून घेतले. तिनें दत्तकपात्र करून घेतलें.

माझ्यामतें बाळंभट कोकणांतीलच असावेत. कारण भीळंभट, पीलंभट, दादंभट अशीं ब्राह्मणांची नांवे शिवकाळांत कोकण किनारपट्टीवरील गांवातूनच प्रचलीत होती.

नंतर शके १५९५ चे साली गागाभटजी व शिष्ट संभवित दहा - वीस ब्राह्मण - पंडित, तसे वैदिक धर्माचे ठायी परम कुशल, चतुरस्त्र असे पांच - पंचवीस समागमें घेऊन, गागाभटजी सातारा मुक्कामी आले. (२७ जुलै १६७३ रोजीं शिवसैन्यानें सातारा जिंकला होता. १३ ऑक्टोबर १६७३ रोजीं शिवराय किल्ले सातारावर आले.)

श्रीशिवदिग्विजय बखरींतील उपरोक्त उल्लेख आपणांस शिवराजाभिषेक समयींच्या उपस्थित उच्चपदस्थ पंडित ब्राह्मणांची संख्या सांगतो. ज्याअर्थी गागाभट्ट त्यानां आपल्या सोबत घेऊन आले, त्यावरून त्या वैदिक पंडितांचे श्रेष्ठत्व समजते.

शिवराजाभिषेक प्रसंगी २ हजार ते २० हजार ब्रह्मवृंद किल्ले रायगडच्या आसमंतांत जमला होता. त्यापैकी निरनिराळया वैदिकशास्त्रांच्या निदान १ हजार ब्राह्मणांस किल्ले रायगडवर यज्ञयागादि प्रसंगी सामावून घेतलें गेलें. बाकीचे ब्राह्मण दान घेण्यासाठीं व आशिर्वचने देण्यासाठीं सहकुटुंबसहपरिवार पाचाड येथे घरांघरांतून मुक्कामास होते.

खालील दत्तकविधानपत्रावरील साक्षींच्या आधारें शिवराजाभिषेक समयीं उपस्थित ब्रह्मवृंदापैकी निदान सोळा नांवे निश्चित करतां येतात.

मला त्या १६ नांवांच्या आधारें ब्राह्मण समाजांतील मुख्य व सूक्ष्म पोटभेद करतां आलेले नाहीत. कोणास तसे करतां आल्यास कोणकोणत्या शाखेचे ब्राह्मण शिवराजाभिषेकास उपस्थित होते; हें अंशतः ज्ञात होईल. तसेंच शिवरायानीं महाराष्ट्रांतील समस्त ब्रह्मवृंद एक मानला होता, हें हि लक्ष्यांत येईल. विदर्भापासून तंजावर व कोकणांतील शृंगारपूर या आसमंतांतून ब्रह्मवृंद किल्ले रायगडवर राजाभिषेकास आला होता.

श्रीनृपसातवाहन शके १५९६, आनंदनाम संवत्सरे, ज्येष्ठ शुध्द द्वादशी शुक्रवार, घटी २१ पले ३४ वि. ३८-४० सी ४२ तीन घटिका रात्र उरली तेव्हा राजश्री शिवाजीराजे सिंहसनी बैसले.

श्रीनृपसातवाहन शके १५९६, आनंद नाम संवत्सर, आषाढ शुध्द एकादशी रोजी राजपुरोहित प्रभाकर भट्ट यांच्या धर्मपत्नीने बाळंभट याला दत्तक घेतलें.

त्यावर साक्षी आहेत, त्या येणेप्रमाणे -

१) शामभट आरवीकर २) महादेवभट आरवीकर ३) विश्वनाथभट टोके ४) बाळकृष्णभट टोके ५) खंडभटगुरू ६) अनंतभटगुरू ७) शंभुभट गौतम ८) रत्नेश्वर निवासकर ९) धेनु जोशी १०) कोनेर जोशी ११) गागाभट १२) जयरा १३) केशवभट शृंगारपूरकर १४) मुकूद जवदा १५) महादेवभट पोटे १६) होसिंग नरसिंहभट

वरील १६ नांवापैकी मी घेतलेला मागोवा -

शामभट आरवीकर -

मल्हारभट व रामेश्वरभट हे आर्वी, देऊळगांव, हिंगणी, पेडगांव, वडगांव व शिरापूर या बाबाजी भोसले पाटील (शिवरायांचे पणजोबा) यांच्या गांवचे कुळकर्णी व जोशी. रामेश्वरभटांचे पुत्र प्रभाकरभट व मल्हारभटांचे पुत्र लक्ष्मणभट. परत लक्ष्मणभटांचे पुत्र मल्हारभट. रामेश्वरभटानी बाबाजी, मल्होजी व विठाजी, राहाजी या तीन पिढया पाहिल्या. यावरून ते दीर्घीयुषि होते. पुढे मल्हारभट व प्रभाकरभट शहाजीराजांसोबत कर्नाटकांत गेले. प्रभाकरभट शिवरायांसोबत महाराष्ट्रांत आले. किल्ले राजगडवर शिवरायांचे कुलोपाध्याय झाले. मल्हारभटांचे बंधु शामभट आरवीकर. पुढे राजाराममहाराजांसोबत तंजावरला गेले. पुढे पन्हाळयांस राहिले. कोल्हापूर घराण्याचे राजोपाध्याय झाले.

विश्वनाथभट टोके -

शहाजीरााजंच्या पदरीं असलेले व राधामाधवविलास चंपूंच नमूद केलेल विश्वनाथट ठोकेकर. देशस्थ ब्राह्मण. शाहाजाराजांचे मर्जीप्रमाणे चालण्यांत चतुर म्हणून जयराम कवी याचे वर्णन करतो.

अनंतभटगुरू -

चिटणीस बखरींतील कलम २६१ याजवरून केशव पंडित व भालचंद्रभट पुरोहित हे बाळाजी आवजींचे गुरूस्थान व सोमनाथभट कात्रे त्यांचेच आवडीत. यांस १० हजार रूपले व पालख्या देऊन बावास (गागाभट) व पैठणकर (अनंतभटगुरूः यांस आणावयास रवाना केलें. त्यानीं जाऊन महाराजांचा उद्योग मनोरथ त्यांस समजावून त्यांस व पैठणकर पंडितास एक वाक्यता केली, आणि उदयपूर, जयपूर येथे राजाभिषेक विधी होतो. त्याप्रमाणें करावेसे सिध्द करून घेऊन रायगडी आले.

अनंतभट गागाभटांचे गुरूबंधु. त्यानीं ‘राजाभिषेक पध्दती’ व ‘राजाभिषेक’ हे ग्रंथ रचिले.

कोनेर जोशी -

मराठी साम्राज्याची छोटी बखर : शिरके याणीं विचार केला कीं, या कलशानें राज्यास बुडविले. यासि नेऊन मारावे. म्हणोन पंचवीस हजार हशम मेळविसे. हे वर्तमान कोन्हेरपंत (कोनेर जोशी) कबजीकडील कारभारी याणी कबजीस श्रुत केले.
यावरून पुढे कोनेर जोशी हे कवी कलशाचे आश्रीत होते.

गागाभट -

रामकृष्णभटाचे पुत्र दिनकर उर्फ दिवाकर यानां विश्वेश्वरभट नांवाचा पुत्र झाला. यालाच गागाभट म्हणतात.

यानीं ‘दिनकरोध्दोत’, ‘राजाभिषेकप्रयोग’, ‘कायस्थधर्मप्रदीप’ हे ग्रंथ रचिले. गागाभटानीं संन्यास घेतला होता. संन्यास घेतल्यावर त्यानीं ‘शिवार्कोदय’ हा ग्रंथ लिहीला.

जयराम -

नाशिक प्रांतातील मार्कडेय किल्ल्याच्या पायथ्यासी याचे मूळगांव. त्याच्या आईचे नांव ‘गंगावा’. वडिलाचे नांव ‘गंभीरराव’ उपनाम ‘पिंडये’. शहाजीराजांनी बंगळूर प्रांती मुख्य ठाणे केल्यावर जयराम कवी त्यांच्यापासीं आश्रयार्थ राहीला.
यानें ‘राधामाधवविलासचंपू’ व ‘पर्णालपर्वतग्रहणाख्यान’ यांची रचना केली.

केशवभट -
केशवभट मूळ शृंगारपूरचे रहाणारे होते. ते शिवरायांकडे इसवी सन १६७०पूर्वी रघुनाथ पंडितराव यांच्या आश्रयानें ‘उपाध्याय’ म्हणून येऊन राहिले होते. केशवभट हे रामायण - महाभारताची प्रवचने आऊसाहेब, शिवराज्ञी व येसूबाई इत्यादीसाठीं करीत.
यानीं ‘राजारामचरितम्’ व ‘दण्डनीतिप्रकरणम्’ हे ग्रंथ रचले.

होसिंग नरसिंहभट -

वेदमूर्ती नरसिंहभट बिन रामचंद्रभट मंगळवेढेकर हे सिंहासनारूढं महाराजांचा दानाचा देकार सुरू होता. त्यावेळी उपस्थित होते. हे थोर भले ब्राह्मण देखोन यांस कित्येक दानद्रव्य महाराज देत होते. परंतु त्यांनीं तें मान्य केलें नाहीं. तेव्हां राजश्रीनीं काय हेतू आहे, म्हणून पुशिलें. ते समयीं नरसिंहभटानीं विनंती केली कीं, आपणास आदिलशाहाने जे इनाम दिलें आहें. (तें महाराजांनी दाभोळ जिंकल्यावर अमानत केलेलं आहे.) तें करार करून वृत्तीपत्रे करून घ्यावे. ते गोष्टी (महाराज) घ्यावे. सिंहासने असतां मान्य करून हस्तोदक ते क्षणी दिल्हे. त्याप्रमाणे चालत आहे. नरसिंहभट हे तर्फ खेड, मामले दाभोळ येथील उपाध्ये व ज्योतिषी होते.
माझ्या हातासीं असलेल्या अल्प - स्वल्प शिवकाळातील ऐतिसाहीक साधनांच्या माध्यमांतून अशा प्रकारें किल्ले रायगडवर शिवराजाभिषेक समयास उपस्थित असलेल्या ब्रह्मवृंदांची यादी बनवीत आहे.

Site Designed and Maintain by Net Solutions