शिवराजाभिषेक
  मुडस् ऑफ रायगडच्या निमित्ताने
  मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली
  धर्मरक्षक - राजा शिवाजी
  शिवरायांचा समकालीन गणिती
  आईसाहेबांची सुवर्णतुला
  रायगड परिक्रमा
  छत्रपति शिवाजी महाराजांची नाणी
  रायगड
  संक्षिप्त रायगड
  भट्ट घराणे
  श्रीशिवराजाभिषेक सुमुहूर्त पाऊसाळयांत कां धरिला?
  शिवराज भूषण
  छत्रपति शिवाजी महाराज व भवानी माता वरप्रदान
  राजधानी रायगडाच्या बांधणीतील काही अभिनव वैज्ञानिक प्रयोग
  किल्ले रायगडावर प्रकाशित झालेली पुस्तके
  ‘गनिमीकावा’ या युध्दशास्त्राचे अनमोल उदाहरण “प्रतापगड युध्द”
  मंचकारोहण आणि सिंहसनारोहण
  शिवराजाभिषेक कारण, कार्य, भाव
  शिवराजाभिषेक समयास उपस्थित ब्रह्मवृंद
  राज्याभिषेक
  मराठा राजघराण्याची नाणी
  पहिला श्रीशिवराजाभिषेक
मुडस् ऑफ रायगडच्या निमित्ताने
श्री. अतुल घाग

मी कुणी लेखक नाही, कवी नाही किंवा इतिहासकारही नाही. केवळ छांदापायी कॅमेरा हाती घेतला व छायाचित्रकार झालो. पण मी प्रामाणितपणे कबुल करतो की मला नांव मिळवून दिले ते माझ्या ‘मुडस् ऑफ रायगड’या छायाप्रर्दशनाने.

सर्व प्रथम मी रायगडावर गेलो ते माझ्या मित्राचा प्रोजेक्ट करायला. रात्रीची मुंबई सेंट्रल स्थानकाहून सुटणारी एस.टी. रायगडवाडीत सकाळी सहा वाजता येते. ते थंडीचे दिवस होते. चित्त दरवाजामधील खिंडीतून मला जेव्हा मित्राने रायगड दाखवला तेव्हा माझा विश्वासच बसेना. हा गड आहे की निसर्गाचा अविष्कार भल्या मोठ मोठाल्या ढगांनी गडाच्या टकमक

टोकापासून ते हिरकणी बुरुजापर्यंत गराडा घातला होता. मधुनच माथ्यावरील भाग दिसत होता. जणू रायगड ढगांवर स्वार होऊन अलगत तरंगत फिरायला निघाला होता. जसा उजेड वाढू लागला तसे ढग विरळ होत गेले. आम्ही आमच्या सामाना सहीत महादरवाजा पर्यंत येई तोवर माझी पुरती दमछाक झाली होती. मी मित्राला म्हटले ‘बाबा रे गडाचे

छायाचित्रण तुच कर माझ्यात काही आता त्राण उरले नाहीत. तुम्ही सर्व जण पुढे निघा, मी जरा वेळ आराम करतो’सर्व जण निघून गेल्यावर मी एकटाच महादरवाजाजवळ राहिलो. गाडीतील अर्धवट झोप, गडाची खडी चढण अन् हवेतील गारवा त्यामुळे महादरवाज्याच्या मांडीवर माझा चटकन डोळा लागला.

सकाळी नऊच्या सुमारास कुणीतरी जाग केल्याचं जाणवलं. आजूबाजूस कुणीही नव्हते. सकाळची कोवळी सोनरी किरणं अंगावर घेत रायगड सजत असताना तो ऐवढाला मोठा महादरवाजा मला. जाग करीत होता. म्हणत होता. ‘अरे आणखी किती वेळ झोपशिल?’ असं झोपून कसं चालेल? इथून तर खरी सुरुवात आहे. मी बघ उन, पाऊस,

अंगाखांद्यावर झेलत साडे तीनशेवर्षे इथं खडा पहारा देत जागा आहे. या इथुनच मी महाराजांना स्वारीवर जाताना व विजय संपादून परत येताना पाहिलाय. कित्येक मानाच्या पालख्या व परदेशी पाहुणे इथुनच महाराजांच्या मुजऱ्याला गेलेत. कित्येक सोहळयांसाठी सलामीचे बार इथूनच उडविलेत अन् शत्रूंवर आग ओकणारी भांडी इथूनच गर्जलीत आणि तु चक्क

माझ्या मांडीवर येवून झोपा काढतोस’ मग मला स्वस्त बसवेना. मी तेथून तडक निघालो व थेट एम. टी. डी. सी. वर पोहचलो. सर्व मंडळी फ्रेश होऊन माझी वाट पहात होती. मी आंघोळ उरकून चहा घेताना त्यांना म्हणालो आज आपण छायाचित्रण न करता नुसता गडच फिरुया. मग गडभ्रमंतीला सुरुवात झाली. गड फिरत आम्ही श्री जगदीश्वराचे

दर्शन घेतले व मंदिराच्या नगारखान्यापाशी आलो. अगदी वाकून नगारखान्याच्या पायरीवर कोरलेला शिलालेख वाचला ‘सेवेचे ठाई तत्पर’ रायगडवरील बांधकाम प्रमुख हिरोजी इंदुलकराच्या नावाचा हा शिलालेख पंढरीच्या नामदेवाच्या पायरी इतकाच पवित्र.

भवानीटोक, वाघदरवाजा, टकमकटोक पाहून आम्ही संध्याकाळी वसतीस्थानी आलो. रात्रीचे जेवण उरकून झोपण्यासाठी तयारी करणार इतक्यात मी सर्वांना म्हणालो ’चला रे, जरा जगदिश्वर मंदिरात जावू या! सर्वांनी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. एक जण म्हणाला ’तुला काय वेड लागल आहे का? आता रात्रीचे दहा वाजून गेलेत, निवांत झोप.

उद्या गडाचे छायाचित्रण करायचयं. त्यातून तुला जायचे असेल तर जा आम्ही झोपतो’ मला मात्र जगदीश्वराजवळील तो शिलालेख अस्वस्थ करीत होता. मन चलबिचल करीत होता. माझी ही अवस्था समिर दळवीला कळली असावी बहुतेक. तो शून्य नजरेने माझ्याकडे पहात होता. मी समिरकडे क्षणभर पाहिले मात्र तो लगेच उठला म्हणाला चल जगदीश्वर

मंदिरात जावूया. झोंबणारा गारवा. नितळ आकाशातील तारांगण अन् रहस्यमय गुढ शांतता अनुभवीत आम्ही दोघे जगदीश्वराच्या त्या पायरीपाशी आलो. रात्री काळोखाच्य वेळीसुध्दा तो शिलालेख मला स्पटीकाप्रमाणे भासला. भारावल्यागत मी त्यावरील अक्षर पहात होतो. वाचत वाचता होतो. अन् वाचता शिकतही होतो.

आता ती पाटी मला शिकवत होती. सांगत होती. नव्हे ती चक्क माझाशी बोलत होती. ‘अतुल, आज मी कित्येकांना बघते आहे पहाते आहे. बरेच शिवप्रेमी गडावर येतात अन् जातात. पण मला तुझ्यात काही तरी वेगळ दिसल म्हणून मी तुला पुन्हा इथवर आणल. आता एक, हा गड पुढे राहिल की न राहिल मला माहित नाही. परंतु इथला प्रत्येक

चिरा न् चिरा, तो नगारखाना, ते शिवरायांच्या सिंहासन, ती समाधी, ते तलाव, ते महाल ... राणिवसा ... स्तंभ ..... सारं सारं तू जपून ठेव. तु फक्त एकच कर या साऱ्या वास्तु शिवकालातील वैभवात कशा नटलेल्या ... सजलेल्या असतील ते बघण्याच्या दृष्टीकोन ठेव. माझा हिवाळा माझा उन्हाळा माझा पावसाळा त्यावेळी मी

कसा दिसतो त्याचा तू अभ्यास कर व त्याप्रमाणे लोकांपुढे खरा रायगड दाखवण्याचा प्रयत्न कर. तु काढणार असलेले प्रत्येक फोटो खुपच वेगळे असायला हवेत याचे भान ठेव. कालाय तस्मे नम: प्रमाणे माझ्या अंगावरुन सर्वभक्षक काळाचा हात हळुवारपणे फिरत असतानाही माझ्या अंगावरील माती तिच आहे. महाराजांनी खुप कष्ट घेवून मला माझ्या थोरल्या

भावा समोर सजवून उभ केल त्यांचे श्रम वाया जावू देऊ नकोस ....’

.... समिरचा हात माझ्या खांद्यावर पडला आणि माझी समाधी भंग पावली. मी समिरला म्हटले चल निघू. पायरीला पाया पडून मागे फिरलो. भारावल्यागत, झपाटल्यागत. इतका की महाराजांच्या समाधीला मुजरा करायचाही राहून गेला.

मी जे हे लिहलय ती वास्तू स्थिती आहे. माझ्या आयुष्यातील अंतरीम सत्य आहे. ती पायरी माझ्याशी बोलली. अगदी आत्मीयतेने बोलली. मी त्या पायरीशी इमान राखल. दिलेला शब्द पाळला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून छायाचित्रणास सुरुवात केली. वर्षभरात सर्व ऋतूंतील असंख्य फोटो घेतले व हळूहळू मुडस् ऑफ रायगड संग्रह आकाराला

येवू लागला. यातील प्रत्येक फोटो बोलतो. तीनशे वर्षापुर्वीचा इतिहास सांगतो. चंद्र सुर्य आस्मानात असतानाचे शिवराय, अवकाशातून शिवरायांवर होणारी तारकावृष्टी, भुतली परावर्तीत झालेला नगारखाना, गंगासागरात अथांग बुडालेले स्तंभ, उलटा की सुलटा या संभ्रमात टाकणारी प्रतिबिंबीत मेघडंबरी, शिवसमाधी, टकमक टोक, भवानी गुहा, हिरकणी

बुरुज, पाली सारखा दिसणारा हिरवागर्द पोटल्याचा डोंगर, फोटो काढतोय हे कळल्याबरोबर आपलाही फोटो यावा म्हणून दाटीवाटीने एकमेकांच्या अंगावर उडया मारणारे ढग, तो सुर्योदय, तो सुर्यास्त अन् अजूनही सेवेचे ठाई तत्पर अशी जाणीव करुन देणारा तो शिलालेख.

मी प्रमाणिक पणे कबुल करतो की यातील एकही फोटो मी काढलेले नाही. नियतीनेच माझ्या करवी ते काढून घेतलेत. अखेर तेच खरे झाले पायरी जिंकली मी हरलो. आज मी छायाचित्रकार म्हणून कितीही मोठा झालो तरी माझी जागा तिच आहे. त्या पायरी पाशी.

Site Designed and Maintain by Net Solutions