शिवराजाभिषेक
  मुडस् ऑफ रायगडच्या निमित्ताने
  मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली
  धर्मरक्षक - राजा शिवाजी
  शिवरायांचा समकालीन गणिती
  आईसाहेबांची सुवर्णतुला
  रायगड परिक्रमा
  छत्रपति शिवाजी महाराजांची नाणी
  रायगड
  संक्षिप्त रायगड
  भट्ट घराणे
  श्रीशिवराजाभिषेक सुमुहूर्त पाऊसाळयांत कां धरिला?
  शिवराज भूषण
  छत्रपति शिवाजी महाराज व भवानी माता वरप्रदान
  राजधानी रायगडाच्या बांधणीतील काही अभिनव वैज्ञानिक प्रयोग
  किल्ले रायगडावर प्रकाशित झालेली पुस्तके
  ‘गनिमीकावा’ या युध्दशास्त्राचे अनमोल उदाहरण “प्रतापगड युध्द”
  मंचकारोहण आणि सिंहसनारोहण
  शिवराजाभिषेक कारण, कार्य, भाव
  शिवराजाभिषेक समयास उपस्थित ब्रह्मवृंद
  राज्याभिषेक
  मराठा राजघराण्याची नाणी
  पहिला श्रीशिवराजाभिषेक
‘गनिमीकावा’ या युध्दशास्त्राचे अनमोल उदाहरण
“प्रतापगड युध्द”
श्री. अरूण ठाकूर

‘प्रतापगड रणसंग्राम’ म्हणजे महाराजांच्या युध्दशास्त्राला, रणधुरंधरांना दिलेलं एक अजोड देणं!

शिवचरित्र हे कितीही वाचल-ऐकलं तरी त्याची गोडी कधी संपतच नाही. विररसाने ओतप्रोत भरलेले स्वधर्म आणि स्वदेशाभिमान, तसेच स्वातंत्र्य प्रेरणेने प्रेरित होऊन, शीर हातावर घेऊन प्राणपणाने लढणारे लढवय्ये, तुटपुंज्या आयुधाने आणि कमीत कमी सेनेच्या साथीने, आपल्यापेक्षा तीनचार पटीने बलाढय असणाऱ्या शत्रूशी मुकाबला करून जास्तीत जास्त पराक्रम करून प्रचंड मोठा विजय मिळविणे हे चमत्कार ठायी ठायी पहावयास मिळतात.

या चरित्रातील सर्वच प्रसंग असे आहेत की, त्या प्रत्येक प्रसंगावर स्वतंत्र विचार व्हावा. परंतु त्यातील दोन प्रसंग अत्यंत महत्त्वाचे आहेत. असे मला वाटते. एक म्हणजे आ याहून सुटका, व दुसरा अफजलखान स्वारीचे प्रतापगड युध्द. या दोन्ही ठिकाणी श्रीशिवछत्रपतींच्या कुशल राजकारणाचा अत्यंत भेदक असा प्रभावी पैलू दिसून येतो. केवळ अंदाज बांधण एकवेळ सोप असेल, परंतु विचारपूर्वक अंदाज बांधून त्याची योग्य आखणी करणे, आणि ते सारं आपला जीव धोक्यात घालून बेमालूमपणे प्रत्यक्षात उतरवणे व त्यात विजयी होणे, आणि परत आनंदी मनाने स्वराज्याच्या पुढील कामास लागणे. इथे मन कुंठीत होते आणि मग हे सारंच अजब वाटू लागत.

श्री भवानीदेवीच्या तेजस्वी प्रेरणेने स्वराज्य स्थापनेचे स्वप्न शिवाजीमहाराज आणि त्यांचे मावळे साकार करीत होते. त्या स्वातंत्र्याचा घास घ्यावयास, तो स्वातंत्र्याचा प्रयत्न पायाच्या टाचेखाली चिरडून टाकावयाच्या गर्जना करीत एक महाभयंकर झंझावात प्रचंड शक्तिनिशी चालून आला. त्याची कर्तबगारीही तेवढीच प्रचंड होती. त्याच्या समशेरीचा दरारा असा होता की, सारी दख्खन आणि लंका त्याच्या धाकाने थरकापत होती. औरंगजेबासारख्या महापाताळयंत्री कर्दनकाळालाही बीदर कल्याणीच्या मोहिमेत त्याने आपल्या लष्करी करामतीचा तडाखा दिला होता.

अशा या अफजलखानाचा फिरंगी दिनांक १० नोव्हेंबर १६५९ रोजी मध्यान्ही शिवाजी महाराजांनी मोठया कौशल्याने वध करून, त्याच्या प्रचंड फौजेचा आपल्या क्षुल्लक मावळी फौजनीशी धुव्वा उडविला, आणि प्रचंड विजय मिळविला. त्यांच्या या राजनितीला, गनिमी युध्दनितीला आणि शौर्याला उभ्या जगात तोड नाही.

युध्द शास्त्राच्या दृष्टीने जगातील पांच महत्त्वपूर्ण युध्दात शिवचरित्रातील अत्यंत कठिण अशा समरप्रसंगाचा प्रतापगड युध्दाचा समावेश आहे. ‘गनिमीकावा’ या पध्दतीने खेळले गेलेले हे युध्द जगातील एकमेव व पहिलेच उदाहरण आहे.

शिवछत्रपतिंची युध्दनिती हा जगभरातील युध्दशास्त्राच्या संशोधकांच्या संशोधनाचा विषय आहे.

शिवाजीमहाराज त्यावेळी एका विशेष प्रकारच्या युध्दपध्दतीचे जनक होते. ते शास्त्र म्हणजे ‘गनिमीकावा’ होय. सावशीच्या लढाईचे वर्तमान ऐकल्यानंतर पुण्याहून पटवर्धनांच्या वकिलाने मिरजेस जे पत्र लिहिले त्यात गनिमी लढाईचा अर्थ आला आहे. तो असा - “शत्रूचे सामान भारी असल्यास बुनगे एकिकडे लावून द्यावे आणि सडी फौज करून आज या ठाण्याजवळ, उद्या दुसऱ्या ठाण्याजवळ याप्रमाणे गनिमाई करावी.”

समर्थांनी वर्णिलेल्या महाराष्ट्रधर्मात गनिमी युध्दास ‘वृकयुध्द’ (लांडगेतोड) असे नाव दिले आहे. या युध्दात थोडया सैन्यानिशी मोठया सैन्याला तोंड देऊन त्याचा नाश करता येतो. शिवाय अशा युध्दास डोंगराळ प्रदेश असल्यास त्याची युध्द करणाऱ्यास चांगली मदत होते.

ज्या प्रदेशात युध्द करावयाचे असेल तेथील खडान् खडा माहिती सेनापतिस असावी लागते. ती माहिती महाराजांस जितकी होती. तितकी खानाला नव्हती. कारण स्वतः खान हा महाराजांइतका त्या प्रांतातून युध्दशास्त्रातील तजविजींच्या व हालचालींच्या दृष्टीने विचार करित फिरलेला नव्हता. दुसऱ्याने दिलेल्या माहितीवर विसंबून त्याला आपल्या मोहिमेच्या तजविजी व हालचाली ठरविणे भाग पडले होते. दहा वर्षे या भागात राहिल्यामुळे इथली थोडीफार माहिती त्याला होती. पण लढाईच्या वेळी खास प्रसंगी उपयोगी पडेल अशी या प्रांताची पहाणी त्याने केली नसावी.

महाराज लढाईशिवाय इतर वेळीही असल्या प्रदेशाच्या सर्व भागातून, दऱ्याखोऱ्यातून, जंगलांतून, घाटांतून फिरून वेळप्रसंगी कोणत्या जागेचे काय महत्त्व आहे व तिचा पुढे काय उपयोग होईल याचा आपल्या आरंभिलेल्या कार्यक्रमावर दृष्टी देऊन विचार करित असत. फौजा लपविण्यासाठी जागा कोठे आहेत, लहान लहान टोळयांनी रहाण्यामध्ये जंगलांचा व झाडीचा किती फायदा होतो, रात्रीचा व अंधाराचा फायदा घेऊन शत्रूचे पहारे व चौक्या लुटता येणे व चुकविणे कसे शक्य असते, त्या चुकवून त्याच्या छावणीमध्ये सडया टोळयांनी आंत घुसून त्याची नासधूस कशी करता येते, त्यामुळे शत्रूचा गोंधळ होऊन त्या धावपळीत अंधारामुळे त्याच्याच गोळागोळीने त्याचीच माणसें कशी जायबंदी होतात, अशा अचानक हल्ल्याने धाडशी सेनापतिचा वचक शत्रूवर कसा बसतो, यामुळे शत्रूचा जोम व हिम्मत कशी कमी होते, त्याच्या गोळागोळीने झालेली त्याचीच हानी ही स्वतःच्याच माऱ्यामुळे झाली हे न कळून प्रतिपक्षाच्या छाप्यामुळे झाली असे वाटून हल्ला करणाऱ्या सैन्याचा दरारा व भय त्याला कसे वाटते, ह्या कारणांमुळे हल्लेवाल्या छोटेखानी सैन्याचा जोम कसा वाढतो वगैरे सर्व गोष्टी व युध्दातील खाचाखोचा महाराजांना पूर्णपणे स्वानुभवाने माहित होत्या. अशा रितीने भौगोलिक माहितीचा फायदा घेऊन महाराजांनी आपला हेतू तडीस नेऊन खानाची कशी दुर्दशा केली हे या प्रतापगड युध्दामुळे लक्षात येते.

(आपले उद्दिष्ट साधण्यास अनुकूल असलेले रणक्षेत्र निवडून काढणे व तेथे शत्रूशी लढाई देणे हे सेनापतीचे मुख्य काम व युध्द शास्त्रातील धोरणांच्या अनेक अंगापैकी एक मुख्य अंग आहे.)

आपण ठरविलेल्या रणक्षेत्रात शत्रूस लढाई खेळण्यास भाग पाडणे हे युध्द शास्त्रातील एक मोठे महत्त्वाचे तत्त्व आहे. महाराजांनी आपल्या मुत्सद्दीपणाने ते साधून घेतले ही गोष्ट महत्त्वाची आहे. राजकारणाचा युध्दकौशल्याशी (च् ङॠ कक्र ) किती व कसा निकटचा संबंध असतो त्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. कालक्षेप करणें हे जसे युध्दकलेतील एक तत्त्व आहे, त्याप्रमाणे शत्रूचा उत्साह कमी करणे, आपली तयारी वाढविणे, शत्रूला गोंधळात पाडून आपला कार्यभाग साधणे ही सुध्दा त्यापैकीच दुसरी तत्त्वे आहेत.

विजापूर दरबारने ‘आम्ही तुमच्यावर मोहिम करतो वा तुमचे बरोबर युध्द करतो’ असे महाराजांस कळविले नव्हते. महाराजांचा कोणीही वकिल विजापूर दरबारात नव्हता. तरीसुध्दा त्यांचे हेर खाते इतक्या श्रेष्ठ प्रतीचे होते की, शत्रूच्या दरबारात ठरलेली प्रत्येक गोष्ट त्यांना तात्काळ कळत असे. विजापूर दरबारने आपल्या विरूध्द युध्द पुकारल्याची बातमी महाराजांना त्यांच्या हेरखात्याकडून समजली. आणि येणाऱ्या प्रसंगाला तोंड देण्याची तयारी महाराजांनी सुरू केली. महाराजांचे सर्व मिळून सैन्य १० हजार होते.

आदि अदिलशहाच्या विजापूर दरबारात अफजलखानाने शिवाजी महाराजांना ठार मारून वा जिवंत पकडून आणण्यासाठी ठेवलेला पैजेचा विडा उचलला. १२ हजार घोडदळ, १० हजार पायदळ, ८०-९० मोठया तोफा, ३००-४०० लहान तोफा, मोठया तोफांवरील हजार बाराशे खलाशी, लहान तोफखान्याकडील ४॥ हजार खलाशी इत्यादी सैन्यासह खान एप्रिल १६५९ अखेरीस निघाला. वाटेतील हिंदू देवळांवर हल्ले करून मूर्ती फोडत तुळजापूर पंढरपूर मार्गे जूनमध्ये वाई येथे पोहोचला. येताना वाटेत त्याने नविन सैन्य उभारण्याचा सपाटा लावला. वाई येथे आल्यावर त्याने तेथील डोंगराळ मुलखाची सवय व त्या मुलखाची माहिती असलेले ३ हजार मावळे आपल्या पायदळात भरती केले. ३५ हजाराच्या जवळपास सर्व सैन्य होते.

विजापूरहून खान निघाल्याची बातमी समर्थ शिष्यांकडून समर्थांकडे आली व ती त्यांनी ओवी बध्द पत्ररूपाने महाराजांकडे पाठविली. ते पुढीलप्रमाणें -

विवेके करावे कार्य साधन।
जाणार नरतनु हे जाणोन।
पुढील भविष्यार्थी मन।
रहाटोची नये ॥१॥
चालोनये असन्मार्गी।
ºÉत्यता बाणल्या अंगी।
रघुवीर कृपा ते प्रसंगी।
दास महात्म वाढवी॥२॥
रजनीनाथ आणि दिवाकर।
नित्यनेमे करिती संचार।
घालीताती येरझार।
लाविले भ्रमण जगदिशे॥३॥
+Éदिमाया मूळ भवानी।
हेची जगताची स्वामिनी।
एकांती विवेके धरूनी।
इष्ट योजना करावी॥४॥

ह्या ओव्या नेहमीप्रमाणे वाचल्या तर त्यात विशेष असे कांहीच नाही. त्यात गुप्त बातमी सांगितल्याची शंका सुध्दा येणार नाही. परंतु प्रत्येक ओळीतील पहिले अक्षर घेऊन ती सर्व अक्षरे एकापुढे एक मांडली तर ती एक महत्त्वाची बातमी दिसून येईल. ती बातमी म्हणजे ‘विजापूरचा सरदार निघाला आहे!’ ही होय. शेवटच्या दोन ओळीत ‘विवेकाने योग्य योजना करावी’ असा उपदेशही आहे.

प्रतापगडाच्या लढाईत बचावाच्या धोरणाच्या दृष्टीने महाराज्यांना पारघाटाचा व प्रतापगडसारख्या तटबंदीच्या जागेचा अतिशय उपयोग झाला. या युध्दाचा जास्त बारकाईने अभ्यास व विचार करायचा असेल, तर गडाच्या पूर्वेच्या २४ मैलांच्या व उत्तर दक्षिणेकडील ८/१० मैलांच्या सर्व टापूतील प्रदेशाची सूक्ष्म दृष्टीने पहाणी करावी लागेल.

पहाडांच्या सोंडांचा, किल्ल्याचा, नद्यांचा, घाटांचा व खोऱ्यांचा युध्दकौशल्याच्या दृष्टीने किंवा स्थानिक डावपेचांचा विचार करण्याच्या दृष्टीने कसा उपयोग होतो हे युध्दात दिसून येते.

महाराजांचे दोन सेनापती शामराजपंत पद्मनाभी व त्रिंबकपंत युध्दात पडले असतानाही त्यांच्या फौजांनी घाबरून जाऊन पळून न जाता शत्रूला तोंड देत आपली कामगिरी फत्ते केली. ही गोष्ट विशेष लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्या वेळच्या मानाने कौतुकास्पद आहे. शिवाजीमहाराजांनी आपल्या सैनिकांची मानसिक ताकद अशी वाढविली होती. शिवकालातच या अशा गोष्टी घडू शकल्या. पूर्वी व त्यावेळीही इतर सैन्यांमध्ये सेनापति वा सरदार पडला तर सैनिक पळून जात अशी परंपरा होती.

नंतरच्या काळातही व पुढेही १८०३ पासून १८४३ पर्यंत मराठयांची इंग्रजांबरोबर जी युध्दे झाली त्यातील कांही युध्दात मराठयांचा जय झाला. परंतु त्याचा यथायोग्य फायदा न घेता व माघार घेतल्यामुळे इंग्रजांना यश मिळून मराठयांचा मोड झाला. असे इतिहास सांगतो.

अशा प्रकारच्या घोडचुका महाराजांच्या शिस्तीखाली तयार झालेल्या सेनापतिनी व फौजांनी न केल्यामुळे व आपल्यावर सोपविलेली कामगिरी उत्कृष्ट रीतीने तंतोतंत पार पाडल्यामुळे आपल्याहून दुप्पट-तिप्पटीन असलेल्या शत्रूवरही महाराजांना विजय मिळविता आला.

“हे स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा!” असा कानमंत्र सामान्य माणसांना देऊन आपल्या नेतृत्वाने त्याच सामान्य माणसांकडून असामान्य इतिहास घडविणारे छत्रपति हे महान राष्ट्रपुरूष होत.

त्यांचे चरित्र म्हणजे सावध राजकारणाची, पार्थ पराक्रमाची, पुरोगामी विचारसरणीची, नव-नवोन्मेषशालिनी प्रतिभेची, भगिरथ उद्योगाची, उदात्त चारित्र्याची, दक्ष व निष्कलंक राज्यकारभाराची, अतुल शौर्याची, असीम त्यागाची, समतेची, ममतेची व निस्वार्थी लोकसेवेची गाथाच!

“युध्दशास्त्राचे अध्ययन हा राष्ट्रीय अग्रक्रमाचा विषय असावा!” आधार: “प्रतापगडचा रणसंग्राम” (ले. कॅ. मोडक)

Site Designed and Maintain by Net Solutions