शिवराजाभिषेक
  मुडस् ऑफ रायगडच्या निमित्ताने
  मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली
  धर्मरक्षक - राजा शिवाजी
  शिवरायांचा समकालीन गणिती
  आईसाहेबांची सुवर्णतुला
  रायगड परिक्रमा
  छत्रपति शिवाजी महाराजांची नाणी
  रायगड
  संक्षिप्त रायगड
  भट्ट घराणे
  श्रीशिवराजाभिषेक सुमुहूर्त पाऊसाळयांत कां धरिला?
  शिवराज भूषण
  छत्रपति शिवाजी महाराज व भवानी माता वरप्रदान
  राजधानी रायगडाच्या बांधणीतील काही अभिनव वैज्ञानिक प्रयोग
  किल्ले रायगडावर प्रकाशित झालेली पुस्तके
  ‘गनिमीकावा’ या युध्दशास्त्राचे अनमोल उदाहरण “प्रतापगड युध्द”
  मंचकारोहण आणि सिंहसनारोहण
  शिवराजाभिषेक कारण, कार्य, भाव
  शिवराजाभिषेक समयास उपस्थित ब्रह्मवृंद
  राज्याभिषेक
  मराठा राजघराण्याची नाणी
  पहिला श्रीशिवराजाभिषेक

किल्ले रायगडावर प्रकाशित झालेली पुस्तके
श्री. संजेय तळेकर

किल्ले रायगडाबद्दल जेवढं लिहिलं - बोललं गेलं आहे ते एकत्रित संग्रहित नाही. त्याकरिता रायगडासंबधीची सगळी पुस्तकं, काही पुस्तकांमधील प्रकरणे किंवा माहिती तसेच नियतकालिके, अनियतकालिके, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, त्रैमासिके, वार्षिके, वृत्तपत्रीय लेख, विशेषांक थोरा-मोठयांच्या संभाषणाच्या ध्वनिमुद्रिका, चित्रफिती,

स्लाईड, फोटो, स्केचेस, नकाशे वगैरे साहित्याचा शोध घेवून ती एकत्रित करून संग्रहित करणं ही खरं तर काळाची गरज आहे.

हे करणं शक्य नसेल तर रायगड या विषयावर ज्या व्यक्तींकडे संग्रह आहेत. त्या व्यक्तींचे पत्ते मिळवून ते एकत्रित रायगड अभ्यासकांना त्यांना भेटून अभ्यास करता येईल व संग्रहकांनीही आपल्या मुठी उघडून रायगड अभ्यासकांना मार्गदर्शन करायला हवे. असो, म्हणूनच रायगडसंबंधी प्रकाशित झालेल्या जमेल तेवढया पुस्तकांचा आढावा घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

किल्ले रायगडावर प्रकाशित झालेली पुस्तके

१) रायगड किल्ल्याचे वर्णन
लेखक : गोविंदराव बाबाजी जोशी
प्रकाशक : चित्रशाळा प्रेस, पुणे.

१) किंमत :
प्रकाशन: १ जून १८८५ (१८८७)
२) किंमत : ६ आणे प्रकाशन : १९२४

२) रायगड किल्ल्याची जुनी माहिती -
लेखक : अंताजी लक्ष्मण जोशी
किंमत :
प्रकाशन : सा. - इ. स. १८९५

३) रायगडाची माहिती
लेखक : गोविंद गोपाळ टिपणीस, महाडकर
किंमत : अर्धा आणा
प्रकाशन : इ. स. १८९६

४) रायगड वर्णन -
लेखक : केशव अं. हर्डीकर
किंमत :
प्रकाशन : सन १९०६

५) राजधानी रायगड
लेखक : वि. वा. जोशी
प्रकाशक : राजगुरू आणि कंपनी, पुणे.
किंमत : १ रू.
प्रकाशन : इ. स. १९२९

६) रायगडाचा मार्गदर्शक
प्रकाशक : रायगड स्मारक मंडळ, पुणे.
किंमत : १ पैसा
प्रकाशन : १८ एप्रिल १९३५

७) रायगडावरील शिवाजी महाराजांच्या
सिंहासनाची आणि इतर व्यवस्था
लेखक : शं. ना. वत्स जोशी
प्रकाशक : भारत इतिहास संशोधन मंडळ,
त्रैमासिक, वर्ष २०, अंक ३ रा.
किंमत : ४ आणे
प्रकाशन : जाने. १९४०

८) रायगड - यात्रा, दर्शन, माहिती
लेखक : प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे
प्रकाशक : निर्णय सागर प्रेस, मुंबई
किंमत : १ रूपया
प्रकाशन : इ. स. १९५१

९) माझे नाव रायगड
लेखक : बळवंत मोरेश्वर पुरंदरे
प्रकाशक : समाज शिक्षणमाला क्र. १३१.
किंमत : ४० पैसे
प्रकाशन : २० ऑगस्ट १९६१

१०) रायगडची जीवनकथा
लेखक : शां. वि. आवळसकर
प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य
संस्कृती मंडळ, मुंबई
१) किंमत : ४ रू.
प्रकाशन : इ. स. १९६२
२) किंमत : ८.५० रू.
प्रकाशन : इ. स. १९७४
३) किंमत : ७० रू.
प्रकाशन : इ. स. १९९८

११) रायगड
लेखक व प्रकाशक : प. रा. दाते
किंमत : ५ रूपये
प्रकाशन : १ जाने. १९६२

१२) शिवतीर्थ रायगड
लेखक : गो. नी. दाण्डेकर
प्रकाशक : कुलाबा जिल्हा परिषद प्रकाशन
किंमत : २ रूपये
प्रकाशन : इ. स. १९६५

१३) चला रायगडाला - रायगड मार्गदर्शिका
प्रकाशक : श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे
किंमत : १ रूपया
प्रकाशन : इ. स. १९६८

१४) श्रीक्षेत्र रायगड दर्शन
लेखक : गो. नी. दांडेकर
प्रकाशक : रामचंद्र चिंतामण देशमुख, रायगड
किंमत : १.५० रूपया
प्रकाशन : इ. स. १९७४

१५) दुर्गराज रायगड
लेखक : गजानन आर्ते
प्रकाशक : विश्वकर्मा कला केंद्र, महाड
१) किंमत : २.५० रू.
प्रकाशन : ६ एप्रिल १९७४
२) किंमत : २.५० रू.

१६) शिवाजी मेमोरियल्स - द ब्रिटिश ऍटिटयूड
लेखक : व्हि. जी. खोब्रेकर
प्रकाशक : छत्रपति श्री शिवाजी महाराज
राज्याभिषेक त्रिशतक सांवत्सरी महोत्सव
किंमत : ४.५५ रू.
प्रकाशन : २ जून १९७४

१७) शिवस्फुर्तीची स्मृती - रायगड
लेखक : मधु रावकर
प्रकाशक : सरस्वती प्रकाशन, मुंबई
किंमत : १५ रूपये
प्रकाशन : जून १९७४

१८) किल्ले रायगड
लेखक : शंकर अभ्यंकर
किंमत : ८ रूपये
प्रकाशन : ३१ मार्च १९८०

१९) रायगड दर्शन
लेखक : प्र. न. देशपांडे
प्रकाशक : पुरातत्व व वस्तूसंग्रहालये
विभाग महाराष्ट्र शासन
किंमत :
प्रकाशन : इ. स. १९८०

२०) शिवरायांच्या दोन राजधान्या
लेखक : गो. नी. दाण्डेकर
प्रकाशक : टाऊन हॉल कमिटी, हिराबाग, पुणे
किंमत :
प्रकाशन : इ. स. १९८३

२१) रायगड प्रदक्षिणा
लेखक : सोमनाथ समेळ
किंमत : ७.५० रूपये
प्रकाशन : २ एप्रिल १९८४

२२) शिवतीर्थ किल्ले रायगड प्रदक्षिणा
स्पर्धा - एक राष्ट्रप्रेरक उपक्रम
लेखक : गे. ना. परदेशी
किंमत : १० रूपये
प्रकाशन : जून १९८४

 

२३) शिवतीर्थाच्या आख्यायिका
लेखक : प्र. के. घाणेकर
प्रकाशक : पुरातत्व व वस्तूसंग्रहालये विभाग, महाराष्ट्र शासन
किंमत : ४ रूपये
प्रकाशन : इ. स. १९८५

२४) गडांचा राजा - राजांचा गड - रायगड
लेखक : प्र. गो. भाटये
किंमत : ६ रूपये
प्रकाशन : इ. स. १९८६

२५) रायगड स्पर्धा - एक राष्ट्रोध्दारक कार्यक्रम
लेखक : गे. ना. परदेशी
किंमत : ५ रूपये
प्रकाशन : २६ डिसेंबर १९८६

२६) रायगड प्रदक्षिणा
लेखक : गे. ना. परदेशी
किंमत : १२ रूपये
प्रकाशन : ९ फेब्रु. १९८८

२७) ‘तो’ रायगड
लेखक : प्र. के. घाणेकर
प्रकाशक : शिल्पा प्रकाशन, पुणे
किंमत :
प्रकाशन : ३ मार्च १९९१

२८) राजधानी रायगड
लेखक : प्रभाकर भावे
प्रकाशक : वरदा प्रकाशन, पुणे
किंमत : १०० रूपये
प्रकाशन : १५ ऑगस्ट १९९७

२९) रायगड - रम्यकथा
प्रकाशक : प्रसिध्दी विभाग, महाराष्ट्र सरकार, मुंबई
किंमत : ५ पैसे

३०) रायगड - महाराष्ट्र राज्य पदयात्रा व प्रवासयोजना
प्रकाशक : प्रसिध्दी विभाग, महाराष्ट्र सरकार, मुंबई

३१) शिवतीर्थ रायगड रंगीत फोल्डर
प्रकाशक : पर्यटन संचलनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई
किंमत : ५० पैसे

३२) शिवनेरी ते रायगड
प्रकाशक : माहिती व जनसंपर्क महासंचलनालय महाराष्ट्र शासन, मुंबई

३३) छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्या राजसिंहासनावर मेघडंबरी
प्रकाशक : माहिती व जनसंपर्क महासंचलनालय महाराष्ट्र शासन, मुंबई

३४) श्रीशिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे
स्थापना शताब्दी स्मरणिका
ले. सं. : म. श्री. दीक्षित

३५) रायगडाची सहल
लेखक : रमेश द. साठे
प्रकाशक : शिल्पा प्रकाशन
किंमत : १.५० रूपया

३६) शिवतीर्थ रायगड
लेखक : गो. नी. दांडेकर
प्रकाशक : नागेश रामचंद्र देशमुख, परळ, मुंबई
किंमत : २.५० रूपये
पुनर्मांडणी - उदय दांडेकर
प्रकाशक : नागेश रामचंद्र देशमुख, नाते, महाड.
किंमत : १५ रूपये

३७) चला, पाहू रायगड
लेखक : म. श्री. दिक्षित
प्रकाशक : श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ
किंमत : ५ रूपये

३८) एका राजधानीची कहाणी - दुर्गराज रायगड
लेखक व प्रकाशक : उदय दांडेकर
किंमत : २० रूपये

३९) रायगड एक अभ्यास - शोध शिवसमाधीचा
लेखक : गोपाळ चांदोरकर
प्रकाशक : प्रफुल्लता प्रकाशन, पुणे
किंमत : २८ रूपये
प्रकाशन : १० फेब्रु. २०००

४०) रायगड एक अभ्यास - चला पाहुया रायगड
लेखक : गोपाळ चांदोरकर
प्रकाशक : प्रफुल्लता प्रकाशन, पुणे
किंमत : ३० रूपये
प्रकाशन : ८ एप्रिल २००१

४१) रायगड अभ्यासवर्ग
लेखक : पराग लिमये
प्रकाशक : जनसेवा समिती, विलेपार्ले
किंमत : १० रूपये
प्रकाशन : ऑक्टो. २००२

४२) शिवतीर्थ किल्ले रायगड
लेखक : सुधाकर लाड
प्रकाशक : भैरवी प्रकाशन, पनवेल
किंमत : १७५ रूपये
प्रकाशन : १ मे २००४

४३) रायगड एक अभ्यास - वैभव रायगडचे (शिवपुर्वकालीन)
लेखक : गोपाळ चांदोरकर
प्रकाशक : प्रफुल्लता प्रकाशन
किंमत : ५० रूपये
प्रकाशन : २२ ऑक्टो. २००४

४४) किल्ले रायगड - प्रदक्षिणेच्या वाटेवर
लेखक - संकलक : आप्पा परब
प्रकाशक : दुर्गसृष्टी प्रकाशन, विक्रोळी, मुंबई
किंमत : १० रूपये
प्रकाशन : नोव्हेंबर २००५

४५) आजचा रायगड
लेखक : पांडुरंग पाटणकर
प्रकाशक : स्नेहल प्रकाशन
किंमत : ३० रूपये
प्रकाशन : नोव्हेंबर २००६

४६) दुर्गराज रायगड
लेखक : प्रविण वसंतराव भोसले
प्रकाशक : नरसिंह पब्लिकेशन्स, सांगली
किंमत : १५ रूपये
प्रकाशन : डिसेंबर २००६

Site Designed and Maintain by Net Solutions