शिवराजाभिषेक
  मुडस् ऑफ रायगडच्या निमित्ताने
  मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली
  धर्मरक्षक - राजा शिवाजी
  शिवरायांचा समकालीन गणिती
  आईसाहेबांची सुवर्णतुला
  रायगड परिक्रमा
  छत्रपति शिवाजी महाराजांची नाणी
  रायगड
  संक्षिप्त रायगड
  भट्ट घराणे
  श्रीशिवराजाभिषेक सुमुहूर्त पाऊसाळयांत कां धरिला?
  शिवराज भूषण
  छत्रपति शिवाजी महाराज व भवानी माता वरप्रदान
  राजधानी रायगडाच्या बांधणीतील काही अभिनव वैज्ञानिक प्रयोग
  किल्ले रायगडावर प्रकाशित झालेली पुस्तके
  ‘गनिमीकावा’ या युध्दशास्त्राचे अनमोल उदाहरण “प्रतापगड युध्द”
  मंचकारोहण आणि सिंहसनारोहण
  शिवराजाभिषेक कारण, कार्य, भाव
  शिवराजाभिषेक समयास उपस्थित ब्रह्मवृंद
  राज्याभिषेक
  मराठा राजघराण्याची नाणी
  पहिला श्रीशिवराजाभिषेक
शिवराज भूषण
श्री. प्रशांत ठोसर

उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याच्या सर्वसामान्य जगरीतीप्रमाणे ज्यावेळी हिंदुस्थानातील सर्व कवींची धाव दिल्लीच्या मुघल तख्ताकडे असायची त्याचवेळी एक कवी मात्र दक्षिणेतील स्वयंप्रकाशी स्वाभिमानी स्वातंत्र्य सूर्याला वंदन करण्यासाठी उत्तरेहून दक्षिणेत आला होता. तो तेजस्वी स्वातंत्र्य सूर्य म्हणजे छत्रपति शिवाजी महाराज हे सूज्ञांना वेगळे सांगायची

आवश्यकता नाही. पण त्या आगळया वेगळया कवीचे नाव होते “भूषण”. याच हिंदी भाषिक कवीने छत्रपति शिवरायांच्या कार्याची, पराक्रमांची महती समस्त हिंदुस्थानवासियांना आपल्या अनोख्या आवेश पूर्ण शैलीत कथन केली.

स्वराज्य, स्वधर्म, स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि स्वःत्व यांचे निस्सीम अभिमानी असणाऱ्या छत्रपति शिवरायांच्या जन्मतिथीबद्दल आजही इतिहासकारांत दुमत आहे. त्याप्रमाणे भूषण च्या जन्माबद्दलदेखील विवाद आहेत. बहुसंख्य इतिहासतज्ञांच्या मते भूषण हा महाराजांना समकालीन कवी होता. त्याच्या पुष्टयर्थ खुद्द भूषणनेच छत्रपति शिवाजी महाराजांवर

लिहिलेल्या “शिवराज भूषण” या ब्रज भाषेत लिहिलेल्या ग्रंथाच्या ग्रंथ समाप्तीचा काळ दिला आहे तो याप्रमाणे :

सम सत्रहसे तीस पर, सुचि वदि तेरसि भान।
भूषन सिवभूषन कियो, पढियो सुनो सुजान॥

येथे सुचि - ज्येष्ठ मास (महिना); वदि - वद्यं; तेरस - त्रयोदशी; भान - भानुवासर - रविवार. म्हणजे विक्रम संवत १७३० ज्येष्ठ वद्य त्रयोदशी रविवार यादिवशी भूषणाने आपले हे काव्यं पूर्ण केले. वर उल्लेखलेला काळ पंचांगांशी ताडून पाहता शक, तिथी आणि वार या गोष्टी तंतोतंत जुळतात. यावरून भूषणाने हे काव्यं शके १५९६, ज्येष्ठ

वद्य १३ रविवार म्हणजे श्री शिवराजाभिषेकानंतर बरोबर १५ दिवसांनी पूर्ण केले हे सिध्द होते.

तरीही काही विद्वानांच्या मते भूषणाचा जन्मच मुळी शिवरायांच्या मृत्यूनंतर एक वर्षाने झाला आहे. मात्र शिवचरित्रातील अनेक प्रसंगांचे उत्कट, उत्तुंग आणि उत्कृष्ट वर्णन हे आपल्याला भूषणाच्या काव्यात आढळते. कवी भूषण हा दीर्घायुषी असावा कारण तो पुनःश्चं छत्रपति शाहू महाराजांच्या दरबारात आल्याचा उल्लेख, तसेच बाजीराव पेशवे व अन्य काही

महत्त्वाच्या व्यक्तींचा नामोल्लेखही त्याच्या काव्यात आढळतो. परंतु इतिहास चाळताना अनेकदा असे दिसून येते की, मूळ संहितेत बऱ्याच गोष्टी मागावून घुसवून दिल्या जातात. असो.

कवी भूषणाने सर्वप्रथम छत्रपति शिवरायांना औरंगजेबाच्या दरबारात पाहिल असावे असे मानले जाते कारण

साहि रह्यौ जकि, सिवसाही रह्यौ तकि,
और चाहि रह्यौ चकि, बने ब्यौंत अनबनके।
ग्रीषम के भानु सो खुमान को प्रताप देखि,
तारे सम तारे गये मुंदि तुरकन के॥

याप्रमाणे आ याच्या दरबारातील वर्षान तेथे उपस्थित व्यक्तीच करू शकते. भूषणने उल्लेखलेल्या सहा हजारी मनसबदारांच्या पंक्तीत छत्रपति शिवाजी महाराजांना उभे करणे, स्वतःचा अपमान सहन न होऊन शिवरायांची भर दरबारातील गर्जना, रामसिंहाने प्रयत्न करून ही समजूत न पटणे, त्या घटनांना समकालीन पर्शियन (फारसी) व राजस्थानी रेकॉर्ड

अनुमोदन देत आहेत. तरीसुध्दा हे त्याचे वर्णन ऐकीव माहितीवर आधारित असावे कारण दिवाण-ई-खास (क्दृदढङ्ढध्दङ्ढदड़ङ्ढ ण्ठ्ठथ्थ् ढदृध्द ज्. ज्.क्ष्.घ्.च्) भूषणला प्रवेश असेल असे म्हणण्यास एकही सबळ कारण नाही.

भूषण हे त्याचे मूळ नाव नसून त्याचे “पतिराम” हे त्याचे नाव असावे असे कुँवर महेन्द्रपाल यांनी इ. स. १९३० च्या “विशाल भारत” च्या ऑगस्ट महिन्याच्या अंकातील उल्लेखात म्हटले आहे. “कवी भूषण” ही त्याला पदवी मिळाली होती असे खुद्द भूषण एका छंदात म्हणतो.

“कुल सुलक चितकूट पीत, साहस सील समुद्र।
कवी भूषण पदवी दई, हृदय राम सुत रूद्र॥”

म्हणजे चित्रकूट नरेश रूद्रराम (शाह) सुलंकी (किंवा सोळंकी) यांचा मुलगा हृदयराम याने ही पदवी मला (भूषणला) दिली. याच्या वडिलांचे नाव होते रत्नाकर त्रिपाठी. यांना एकूण चार मुले चिंतामणी, भूषण, मतिराम आणि जटाशंकर किंवा नीलकंठ. हे कानपूर जिल्ह्यातील त्रिविक्रमपूर (अपभ्रंश - तिकमापूर) या गावात राहणारे काश्यप गोत्राचे

कान्य कुब्ज ब्राम्हण म्हणजे कनौजी ब्राम्हण घराणे होते. याच गावात बिरबलसारख्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा जन्म झाला होता. प्रख्यात काशी विश्वेश्वरासदृष्यं बिहारीश्वर हे या गावाचे ग्रामदैवत होते. लहानपणी आपण बरेचदा ऐकलेली भूषणच्या निष्क्रीयतेची गोष्ट म्हणजे जेवणातील मिठाची. एकदा घरातील सर्वजण एकत्र जेवत असताना एका पदार्थात मीठ कमी

लागले म्हणून भूषणने त्याच्या वहिनींकडे दोन ते तीन वेळा मीठ मागितले. मात्रं वाढपाच्या कामात व्यस्त असलेल्या त्याच्या वहिनेने भूषणला उद्देशून म्हटले की, “चिमूटभर मीठ तर कमवता येत नाही मग एवढी घाई कशासाठी करता आहात ?” जखमेवर जणू मीठ चोळल्या जाणाऱ्या या प्रश्नाने भूषणचा स्वाभिमान जागा झाला आणि तो भरल्या ताटावरून

उठला. त्याने बाणेदारपणे सर्वांना सांगितले की, आज चिमूटभर मीठावरून माझा अपमान झाला आहे. आता जेव्हा मी गाडा भरून मीठ कमवीन तेव्हाच पुन्हा या घरात पाऊल टाकेन.

तद्नंतर भूषणने खडतर साधना करून प्रयत्नपूर्वक स्वतःचे नाव कवी म्हणून प्रस्थापित केले. मात्रं खुद्द शिवराय आणि भूषण यांची प्रत्यक्ष भेट कुठे झाली. हे इतिहास निश्चितपणे सांगत नाही. असे गृहित धरण्यास वाव आहे की, आग्रा दरबारातील शिवरायांच्या त्या प्रलयंकारी गर्जनेनंतर औरंगजेबाने त्यांना कैदेत ठेवले. कालांतराने महाराज तेथून निसटले.

अनेक इतिहासतज्ञांच्या मते ते पेटाऱ्यात बसून निसटले आहेत. मात्र खुद्दं भूषण त्या प्रसंगाचे वर्णन करताना स्पष्टपणे म्हणतो की,

काँधे धरी कांवर चल्योदी जबचाव सेती एकलिये

जात एक जात चले देवा की
भेषको उतारि डारि डंवर निवारी
डाऱ्यौ धऱ्यौ भेष ओर
जब चल्यौ साथ मेवा की
पौन हो की पंछी हो कि गुटका की
गौन होकि देखो
कौन भांति गयौ करामत सेवा की॥

भूषणचे हे वर्णन समकालीन असल्याकारणे छत्रपति शिवराय पेटाऱ्यांबरोबर वेष बदलून निसटले हे सिध्दं होते, पेटाऱ्यांत बसून नव्हे. (धऱ्यो भेस और जब चल्यौ साथ मेवा की म्हणजे वेष बदलून (भोयांचा वेष धारण करून) मेवा-मिठाईच्या पेटाऱ्यांबरोबर महाराज तेथून निघाले.
आगरा शहरात वास्तव्य असताना भूषण आपले थोरले बंधू चिंतामणी यांजबरोबर स्वतःचे कवित्व औरंगजेबाला ऐकवण्यास त्याच्या दरबारात गेला असावा. तेथे औरंगजेबाच्या आज्ञेनुसार काही छंद त्याला ऐकवण्यापूर्वी त्याने औरंगजेबाकडून अभयदान मागितले होते. त्या समयी जे छंद त्याने ऐकवले ते याप्रमाणे......

किबले की ठौर बाप बादशाह शाहजाहा
ताको कैद कियो मानो मक्के आगि लायी है।
बडो भाई दारा वाको पकरी के मारी डारो
मेहरहू नाही माको जायो सगो भाई है।
बंधू तो मुरादबक्ष बादि चूक करीबेको
बीच ले कुरान खुदा की कसम खाई है।
भूषन सुकवी कहे सुनो नवरंगजेब
एते काम कीन्हे तेऊ पातसाही पाई है॥१॥

हाथ तसबीह लिए प्रात उठै बंदगी को
आपही कपटरूप कपट सू जपके।
आगरेमे जायदारा चौकमे चुन्हाय लिन्हो
छत्रहू छिनायो मानो मरे बूढे बाप के।
किन्हो है सगोत घात सो मै नाही कहो फैरी
पील पै तोरायो चार चुगुलके गपके।
भूषन भनत छर छंदी मती मंदमहा
सौ सौ चूहे खायके बिल्लारी बैठी तपके॥२॥

फैयक हजार जहाँ गुर्जबरदार ठाढे, करि के हुस्यार नीति पकरि समाज की।
राजा जसवंत को बुलाय के निकट राख्यो, तेऊ लखै नीरे जिन्हे लाज स्वामि काज की॥
भूषन तबहू ठठकत ही गुसुलखाने, सिंहलौ झपट गुनिसाह महाराज की।
हटकि हथ्यार फड बाँधी उमरावन की, किन्ही तब नौरंग ने भेट सिवराज की॥३॥

उपरोक्त छंद ऐकून औरंगजेब आलमगीर रागाने लाल झाला. मात्र भर दरबारात दिलेल्या वचनांमुळे तो भूषणला पकडू अथवा मारू शकला नाही. मात्रं पुढील संभाव्य संकटाच्या चाहुलीमुळे भूषणने उत्तर सोडली व तो शिवसूर्याच्या भेटीस दक्षिणेकडे येण्यास निघाला.
राजगडावरील देवळात शिवराय आणि भूषण यांची प्रथम भेट झाली. असाही एक सर्वसाधारण समज आहे. त्यावेळी शिवरायांच्या भेटीस आतुर झालेल्या कवी भूषणने नकळत खुद्द महाराजांनाच त्यांच्या स्तुतीपर

“इंद्र जिमिजृंभपर वाडव सुअंभपर रावन संदभपर रघुकुल राज है।
पवन वारिवाहपर शंभु रतिनाहपर ज्यौं सहस्त्र बाहपर रामद्विजराज है॥
दावा द्रुमदंडपर, चीतामृग झुंडपर भूषण वितुंडपर जैसे मृगराज है।
तेज तम अंसपर कान्हजिमिकंसपर त्यो म्लेंछवंसपर शेर सिवराज है॥”

हे काव्य ऐकवले. असे म्हणतात की, महाराजांना ते काव्य इतके आवडले की, त्यांनी तब्बल १८ वेळा ते पुन्हा पुन्हा भूषणला म्हणावयास सांगितले. अखेर भूषणने थोडया रागानेच ते काव्य परत म्हणण्यास नकार दिला व तो म्हणाला, जर तुम्हाला महाराजांची भेट घडवून द्यायची असेल तर द्या. परंतु आता मी हे काव्य पुन्हा एकदा म्हणणार नाही. तेव्हा

शिवरायांनी स्वतः कोण हे भूषणला सांगितले व त्यास तब्बल १८ लाख रूपये, १८ गावे आणि १८ हत्ती बिदागी म्हणून दिले. काही घटनांना इतिहासात प्रत्यक्ष पुरावा नसतो. परंतु अनेकदा अशा घटना इतिहासातील रूक्षपणा कमी करतात हे निश्चित. यानंतर भूषण काही काळ महाराष्ट्रातच वास्तव्य करून होता. कालांतराने तो पुन्हा उत्तरेत गेला व आपल्या

वहिनीला त्याने चिमूटभर मीठाऐवजी मीठाच्या गाडया भेट म्हणून दिल्या असेही म्हटले जाते. मात्र राजाभिषेकासमयी भूषण हा पुनःश्च रायगडावर आला होता. तो त्यावेळी म्हणतो,

दच्छिन के सब दृःग्ग जिती, दुग्ग सहाय विलास।
सिव सेवक, सिव गढपति, कियौ रायगढ़ वास॥
तहाँ नृप राजधानी करी, जीति सकल तुरकान।
शिव सरजा रचि दान में, किनौ सुजस जहान॥
देसनि देसनि ते गुनी आवत जाचन ताहि।
तिनमें आयौ एक कवि भूषन कहियतु जाहि॥

भूषणच्या काव्यात वीररस हा बहुतांश ठासून भरलेला आहे. आवेशपूर्ण, जोषपूर्ण शैली हा त्याच्या काव्याचा महत्त्वाचा गुण आहे. कल्पना विलासाची भरारी मारण्यास कोणीही भूषणकडूनच शिकावे. कारण एका छंदात तो म्हणतो,
.... प्रेतिनी पिशाचरू निसाचर निसाचरिहु, मिलि मिलि आपुस में गावत बधाई है।

भैरो भूत प्रेत भूरि भूधर भयंकर से, जुत्थ जुत्थ जोगिनी जमाति जुरी आयी है॥
किलकी किलकी कै कुतुहल करति काली, डिम डिम डमरू दिगंबर बजायी है।
सिवा पुछै सिव सो समाजु आजु कहाँ चली, काहु पै सिवा नरेस भ्रकुटी चढाई है॥

तसेच.....

गरूड को दावा सदा नाग के समूह पर,
दावा नागजूह पर सिंह सरताज को।
दावा पुरूहुत को पहारन के कुल पर,
पच्छिन के गोलपर दावा सदा बाज को।
भूषण अखंड नवखण्ड महि मण्डल में,
तम पर दावा रवि-किरन समाज को।
पूरव पछांह देस दच्छिन ते उत्तर लौं,
जहाँ पातसाही तहा दावा सिवराज को॥

एका छंदात तर भूषणने महाराजांचे १४ गुणाविशेषांनी चारित्र्य वर्णन केले आहे, ते याप्रमाणे

सुंदरता, गुरूता, प्रभुता, भनि भूषन होत हैं आदर जामें।
सज्जनता औ, दयालुता, दीनता, कोमलता झलकै परजा में।.
दान कृपानहु को करिबो, करिबो अभय दीनन को बर जामें।
साहस सों रनटेक, विवेक, इतेगुन एक सिवा सरजा में॥

तसेच त्याने ...... सरजा, सवाई, खुमान, शूर, शूर-शिरोमणि, सूरदानीसिरताज, महाराज, भौंसिलाभुवाल, शेर, सिंह, गरीबनिवाज, प्रतापी, छत्रधारी, नरेन्द्र, दक्षिणके नाथ, गाजी, गढ़पति, सेनाके आधार, हिंदुत्वके स्तम्भ, महादानी, महाराजमणि, हिंदूपति, पातसाह, महाबाहु, गढ़पाल, बली, महाबली,

सुभट, नरेश, वीर, पृथ्वीपुरहूत, श्रीमन्महाराजाधिराज, राजाओंके राजा, शाहों के सिरताज, पूतवीर, भूप, रणसिंह, महावीर राना, मर्दाना, संसारके सूर्यं, वीरसिरताज, नृप, सहृदय, ज्ञानवान, स्वजाति, स्वदेश, स्वधर्म-रक्षक, साहसी, बहादुर, मरहट्टपति, प्रतापी नृप इत्यादी ५२ विशेषणे महाराजांच्या गौरवासाठी योजिली

आहेत. ज्या रायगडावर शिवरायांना राजाभिषेक झाला त्या रायगडाचे सुंदर क्वचित अतिशयोक्तीपूर्ण वर्णन भूषणने केले आहे. अर्थात राजकवी, भाट, शाहिर यांच्या कथनाचा तो एक अविभाज्य भाग समजला जातो.

भूषणने भूषण उल्लास, दूषण उल्लास, भूषण हजारा व शिवराज भूषण असे चार ग्रंथ लिहिले असे मानले जाते. परंतु आज दुर्दैवाने शिवराज भूषणसहित काही विस्कळित छंद मात्रं उपलब्धं आहेत. बाकी काहीही शिल्लक नाही. समर्थ रामदासांनी शिवरायांचा गौरव “निश्चयाचा महामेरू ते ..... तरीच म्हणवावे पुरूष, या उपरी आता विशेष काय लिहावे

? या संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. भूषण त्याहीपेक्षा दोन पावले पुढे जाऊन म्हणतो.....”

राखी हिंदुवानी हिंदुवान को तिलक राख्यो
अस्मृति पुरान राखे वेद विधी सुनि मैं।
राखी रजपूती राजधानी राखी राजन की
धरा में धरम राख्यो राख्यो गुन गुनीं में।
भूषन सुकवि जीति हद्द मरहट्टन की
देस देस कीरति बरवानी तव सुनी मैं।
साहि के सपूत सिवराज, समशेर तेरी
दिल्ली दल दाबि कै दवाल राखी दुनी मैं।

वेद राखे विदित पुरान राखे सारयुत
रामनाम राख्यो अति रसना सुधर में।
हिन्दुनकी चोटी रोटी राखी है सिपाहिन की
काँधे मे जनेऊ राख्यो माला राखी गर में।
मीडि राखे मुगल मरोरि राखे पातसाह
बैरी पीसि राख्ये बरदान राख्यो करमें।
राजन की हद्दराखि तेग बल सिवराज
देव राखे देवल स्वधर्म राख्यो घरमें।

देवल गिरावते फिरावते निसान अली
ऐसे डूबे राव राने सबी गये लबकी।
गौरा गनपति आप औरन को देत ताप
आपनी ही बार सब मारि गये दबकी।
पीरा पयंगंबरा दिगंबरा दिखाई देत
सिध्द की सिध्दाई गई रही बात रब की।
कासी हू की कला जाती मथुरा मसीद होती
सिवाजी न होतो तो सुनाति होत सब की।

Site Designed and Maintain by Net Solutions