शिवराजाभिषेक
  मुडस् ऑफ रायगडच्या निमित्ताने
  मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली
  धर्मरक्षक - राजा शिवाजी
  शिवरायांचा समकालीन गणिती
  आईसाहेबांची सुवर्णतुला
  रायगड परिक्रमा
  छत्रपति शिवाजी महाराजांची नाणी
  रायगड
  संक्षिप्त रायगड
  भट्ट घराणे
  श्रीशिवराजाभिषेक सुमुहूर्त पाऊसाळयांत कां धरिला?
  शिवराज भूषण
  छत्रपति शिवाजी महाराज व भवानी माता वरप्रदान
  राजधानी रायगडाच्या बांधणीतील काही अभिनव वैज्ञानिक प्रयोग
  किल्ले रायगडावर प्रकाशित झालेली पुस्तके
  ‘गनिमीकावा’ या युध्दशास्त्राचे अनमोल उदाहरण “प्रतापगड युध्द”
  मंचकारोहण आणि सिंहसनारोहण
  शिवराजाभिषेक कारण, कार्य, भाव
  शिवराजाभिषेक समयास उपस्थित ब्रह्मवृंद
  राज्याभिषेक
  मराठा राजघराण्याची नाणी
  पहिला श्रीशिवराजाभिषेक
संक्षिप्त रायगड
लेखन व संकलन - संजय तळेकर

१) सध्याच्या रायगड जिल्ह्यात अक्षांस १८०, १४ व रेखांश ७३०, २० वर

२) समुद्रसपाटीपासून उंची - २८५१ फुट

३) रायगडाची इतिहासाला ज्ञात असलेली नांवे

१) रायरी
२) रायगिरी
३) जंबुद्विप
४) राजगिरी
५) तणस
६) राशिवटा
७) नंदादिप
८) बंदेनूर
९) भिवेगड
१०) रेड्डी
११) राहिर
१२) शिवलंका
१३) रायगड
१४) इस्लामगड
१५) इंग्रजांनी कौतुकाने दिलेले नाव पूर्वेकडील जिब्राल्टर
) रायगडावरील खळगे व त्यांचा पहारा

१) महाद्वाराचा खळगा
२) टकमकीचा खळगा
३) टकमक पहारा
४) निवडुंगाचा खळगा
५) सातविणीचा खळगा
६) माडाचा खळगा
७) काळया हौदाचा खळगा

अ) या व्यतिरिक्त इतरस्त्र पहार -

१५) चौकी फडाची
१६) चित्ते दरवाजा
१७) धोंडीचा पहारा
१८) वाघदऱ्याखालील पहारा
१९) धारबीडचा पहारा
२०) कळकीचा पहारा
२१) खुबलढा बुरुज
२२) लहाना दरवाजा
२३) उंबराची सदर
२४) नाडालीचा पहारा
२५) तळाचा पहारा

) रायगडाच्या घेऱ्यातील मेटे

१) कोठिनजीकचे मेट
२) म्हशाचे मेट
३) चोखडीचे मेट
४) चाहुटीचे मेट
५) जांभळीचे मेट


८) लिंगाण्याचा पहारा
९) भवानीचा खळगा
१०) वाघदऱ्याचा पहारा
११) बाराटाकीचा खळगा
१२) कोंडेख्रळीचा खळगा
१३) काळकाईचा खळगा
१४) हिरकणीचा पहारा

 


६) टोकाचा पहारा
२७) माथ्यावरील सदरेचा पहारा
२८) बाराटाकीचा पहारा
२९) धामणदऱ्याचा पहारा
३०) नांदगिरीचा पहारा
३१) केळीचा पहारा
३२) तटबंदी हिरकणीची सदर
३३) लिंगाचा पहारा
३४) गोलंदाजाचा पहारा
३५) चिलखताचा पहारा

 


६) निसणीचे मेट
७) सावताचे मेट
८) आंब्याचे मेट
९) तोफेचे मेट
१०) डयूब्याचे मेट
  ६) रायगडाच्या घेऱ्यातील गावे -
  १) मौजे वाळूसरे
२) वाघोली
३) वाडी
४) वाघेरी
५) वारंगी
६) छत्री निजामपूर
७) बावले
८) सांदोशी
९) आमडोशी
१०) कावले
११) करमर
१२) खलई
१३) पुनाडे
१४) सारवट
१५) नेराव
१६) पाचाड
१७) कोंझर
१८) मांगरुण
१९) देवघर
२०) नाते
  ७) रायगडावरील तोफांची नावे
  १) तोफ गंगासागर
२) तोफ मुलना
३) तोफ पेरूजंगी
४) तोफ भुजंग
५) तोफ रामचंगी
६) तोफ पद्मीण
७) तोफ फतेलष्कर
८) तोफ फतेजंग
९) तोफ सुंदर
१०) तोफ रेकम
११) तोफ मुंगसी
१२) तोफ शिवप्रसाद
१३) तोफ गणेश
१४) तोफ लांडा कसाब
१५) तोफ चांदणी
१६) तोफ भवानी
१७) तोफ नागीण
  ८) रायगडाचे अठरा कारखाने (कंसातील प्रतिशब्द राज्यव्यवहार कोशांतील आहेत)
  १) खजीना (कोशागारं खजाना स्यात्)
२) जव्हाहीरखाना (रत्नशाला)
३) आंबारखाना (धान्यकोश)
४) आबादारखाना (जलस्थान)
५) नगारखाना (नौबतखाना)
६) तालीमखाना (व्यायामशाला)
७) जमादारखाना (वसनागर)
८) जिरातेखाना (शास्त्रगार)
९) मुदबखखाना (पाकालय)
१०) शरबतखाना (पानकादिरसस्थानं)
११) शिकारखाना (पक्षिशाला)
१२) शहतखाना (आरोग्यगृह)
१३) पीलखाना (हत्तीशाला)
१४) फरासखाना (राहुटया, डेरे, पाल वगेैरे ठेवण्याची जागा)
१५) उष्टरखाना (उंटशाला)
१६) तोफखाना
१७) दफ्तरखाना (लेखशाला)
१८) दारुखाना (अग्नस्त्रगृह)
  इत्यादी मात्र महाराजांच्या कारखान्यांपैकी दारुखाना हा मोगलांच्या अठरा कारखान्यांपैकी नसून पोर्तुगीज ‘Cada De Palbora’ याच्या धर्तीवर काढला होता
  ९) रायगडाचे बारा महाल -  
  १) पोते (कोषागार)
२) टंकसाळ
३) थट्टी (गोशाला)
४) दरूनी (अंत:पूर)
५) सेरी (तृप्ति समाधान)
६) पागा (अश्वशाला)
७) वहिली (रथशाला)
८) इमारत (बांधकाम)
९) कोठी (धान्यकोठार)
१०) पालखी (शिबिका)
११) सौदागरी (व्यापारी)
१२) छबीना (रात्रिरक्षणम्)
  १०) महाराजांच्या भार्या -  
  १) सईबाई साहेब (पवार-निंबाळकर)
२) सगुणाबाई साहेब (शिर्के)
३) सोयराबाई साहेब (मोहिते)
४) पुतळाबाई साहेब (मोहिते)
५) काशीबाईसाहेब (जाधव)
६) सकवारबाई साहेब (गायकवाड)
७) लक्ष्मीबाई साहेब (मोरे-विचारे)
८) गुणवंताबाई साहेब (इंगळे)
  ११)  शिवरायांचा जन्म (जेधे शकावली) - शके १५५१ शुक्ल संवत्सरे फाल्गुम वद्य त्रितिया, शुक्रवार नक्षत्र हस्त, घटी १८ पळे ३१ गड ५ पळे ७ ये दिवसी राजश्री सिवाजी राजे सिवनेरीस उपजले.
  १२)  राज्याभिषेक (पहिला) - ६ जून शनिवार अष्टमदिन पहाटे महाराज सुर्योदयापुर्वी तास सव्वा तास ज्या वेळेला गर्गाचार्याचा मुहुर्त म्हणून संबोधतात त्या वेळेस सिंहासनारोहण विधी झाला. ज्येष्ठ शुध्द १२ शुक्रवार घटी २१ पळे ३४ विष्कंम ३८-४० सी ४२ तीन घटीका रात्र ठरली तेव्हा राजश्री सिवाजी राजे भोसले सिंव्हासनी बैसले - पौरोहीत्य गागाभट्ट (राज्याभिषेक दुसरा) हा राज्याभिषेक कुंभ लग्नावर, आयुष्यमन, योग असताना, अनुराधा नक्षत्र बुधवार, आश्विन शु॥ ५, आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी झाला. - पौरोहित्य निश्चलपुरी.
  राज्याभिषेकासमयीचे अष्टप्रधान मंडळ (कंसातील प्रतिशब्द हे राज्याभिषेकापुर्वीचे फार्सी शब्द आहेत)
सिंहासनाच्या डावीकडे -
  १) हंबीरराव मोहिते - सेनापती (सर-ए-नौबत)
२) रामचंद्र त्रिंबक - सुमंत (दबीर)
३) निराजी रावजी - न्यायाधीश (काजी-उल-कुजात)
४) मोरेश्वर रघुनाथ - पंडितराव उर्फ दनाध्यक्ष - (सद्र - मुहतसिब)
   
 

सिंहासनाच्या उजवीकडे

  १) मोरोपंत पिंगळे - पंतप्रधान (पेशवा)
२) रामचंद्र निळकंठ - अमात्य (मजमुअदार)
३) अण्णाजी दत्तो - सचिव (शुरु - नवीस)
४) दत्ताजी त्रिबंक - मंत्री (वाकिया - नवीस)
  १४)  महाराजांच्या महानिर्याणानंतर संभाजी राजांनी रायगड आपल्या ताब्यात घेतला तेव्हा अधिकाऱ्यांकडून मागवलेली व स्वत:जातीने तपासणी केलेली रायगडाच्या कुल साहित्याच्या वैभवाची बितपसील यादी –
  सोने ९ खंडी,
होन ५ लक्ष,
तांबे ३ खंडी,
शिसे ४५० खंडी,
लोखंड २० खंडी,
जस्त व शिसे यांची मिश्र धातू ४०० खंडी,
चांदी ५॥ खंडी,
ब्राँझ २७२ खंडी,
निरनिराळया अधिकाऱ्यांकडे ३ लक्ष होन,
निरनिराळया गडांवर ३० लक्ष होन,
भात १७ हजार खंडी,
तेल ७० हजार खंडी,
सौंधव २७० खंडी,
जिरे २०० खंडी,
गोपीचंदन २०० खंडी
गंधक २०० खंडी,
कापडाची ४ हजार पांढरी ठाणे,
हलक्या कापडाचे ३ हजार ठाणे,
बुऱ्हाणपुरी कापडाचे १ हजार ठाणे,
पैठणी कापडाचे ४ हजार ठाणी,
धान्य, डाळी, तंबाखू साखर मोठया प्रमाणात होत्या,
नऊ कोट रुपयांची सोन्याची नाणी,
५१ हजार तोळे सोने,
२०० तोळे माणके,
१ हजार तोळे मोत्ये,
५०० तोळे हिरे,
४० हजार डर्कस,
३० हजार तलवारी,
४० हजार भाले,
६० हजार लाँगडर्कस,
५० हजार दुधारी तलवारी,
६० हजार ढाली,
४० हजार धनुष्य,
१८ लक्ष बाण
   
  १५) महाराजांशी व रायगडाशी परिचित परकीय प्रवासी -
   
  हेन्री ऑक्झेंड्न हा इंग्रजांचा वकिल सुरतेच्या प्रसिडेंट जॉर्ज ऑक्झेंडनचा नातलग कारवारच्या वखारीचा प्रमुख होता. महाराजांनी कारवार जिंकले तेव्हांचा हा परिचय हाच हेन्री ऑक्झेंडन रायगडावर राज्याभिषेकाच्यावेळी हजर होता. त्याच्या बरोबर जॉर्ज रॉबिन्सन, थॉमस मिचेल, आणि नारायण शेणवी हा दुभाषा आले होते. पुढे सन १६७५ मध्ये सॅम्युअल ऑस्टीन हा वकिल महाराजांच्या दरबारी आढळतो. सन १६७६ मध्ये मौलवेअरने रायगडास इंग्रजांतर्फे वकिली करण्यास भेट दिली. संभाजी राजांच्या आमदानीत कॅप्टन गेरी व लेफ्टनंट विल्किन्स आणि नंतर बहूधा केग्विन याने रायगडाला भेट दिली. केनेडी, डग्लस, मेजर हॉल, कर्नल प्रॉथर, लेफ्टनंट क्रॉसबी, लेफ्टनंट रेमन, एन्साइन्स जॅप, डॅशवूड, मेजर बाँन्ड या इंग्रजांनी रायगडास भेटी दिल्याचा उल्लेख आढळतो, हेन्री रेव्ंहिगटन तर शिवकालात कैदी म्हणून वास्तव्यास होता. पोर्तुगीज वकिल गोंझालो मार्टिन आणि डच वकिल अब्राहम लेपेकर यांच्या रायगडवारी बद्दल माहिती उपलब्ध असून मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल, रेव्हेन्यू, कमिशनर क्रॉफर्ड कॅप्टन पिट, जेम्स डग्लस या मंडळीच्या भेटी तर उल्लेखनीय आहेत.
   
  १६) परकियांच्या दृष्टीकोनातून -
   
  सुरतेहुन कारवारला पाठविलेल्या पत्रात इंग्रज म्हणतात की, विलक्षण धाडसी असा दरवडेखोर म्हणून शिवाजीची इतकी ख्याती झाली आहे की लोकांनी त्याचे शरीर हवामय असून त्याला पंखही आहेत असे उठविले आहे. एरव्ही तो एका वेळी अनेक ठिकाणी प्रगट होतो. ह्या बातम्या शक्य तरी कशा होतात? आज तो एका ठिकाणी आहे असे कळले तर लगेच दूरदूर असलेल्या पाच सहा ठिकाणी एका मागून एक अशा तऱ्हेने अप्रतिहतपणे लुटालुट व जाळपोळ करताना तो आढळतो. त्यामुळे त्याचे नावं सर्वतोमुखी झाले असून त्याला हर्क्यूलिसाचे (भिमाचे) सामर्थ आहे असे लोक मानतात.

हेन्री ऑक्झेंडन प्रत्यक्ष पाहून महाराजांचे शब्दचित्र रेखाटताना लिहितो की शिवाजी ४७ वर्षाचा असून देखणा होता. त्याच्या चर्येकरुन त्याची बुध्दीमत्ता व चाणाक्षपणा सहज ध्यानात येई. त्याचा वर्ण पुष्कळ गौर होता त्याची दृष्टी तिक्ष्ण असून नाक सरळ व टोकाशी बाकदार होते. त्याच्या दाढीस निमुळतेपणा असून मिशी बारीक म्हणजे विरळ होती. त्याचे भाषण निश्चयात्मक स्पष्ट पण जलद होते.

अफझल खानाचा प्रतापगडाच्या रणातील वध, सिद्दी जोहार सलाबत खानाच्या करोल वेढयातून यशस्वी पलायन, शाहिस्तेखानाच्या छावणीवर रात्रीच्यावेळी भुतासारखा घातलेला छापा, दस्तुरखुद्द औरंगजेबाच्या आ याला कडेकोट बंदोबस्तात असताना युक्तीने केलेले पलायन. असे एकामागून एक अद्भुत पराक्रम पाहता शिवाजी हा कुणी सामान्य माणूस नसून कोणीतरी महाभयंकर सैतानच असावा अशी शत्रुंची खात्री होणे स्वाभाविकच आहे. राजांनी एकामागून एक मिळविलेल्या विजयाने सारे भयचकित झाले. त्यांचा दराराच एवढा मोठा होता की कुणीही मराठा मुंबईत दिसला की तो शिवाजी आहे असे इंग्रजांना वाटे. बंगालच्या इंग्रज व्यापारांना शिवाजी अमर आहे असे वाटे कारण त्यांच्या मृत्युच्या अफवा त्यांनी इतक्या वेळा ऐकल्या की शेवटी या बातम्यानंतर विश्वास ठेवण्याचे सोडून दिले होते.

ऍबे कॅरे या फ्रेंच प्रवाशाने महाराजांचे पराक्रम ऐकून त्यांची तुलना सीझर व गुस्ताफ ऍडॉल्फ यांच्याशी केली आहे. व तो म्हणतो की एखाद्या राजाला आणि महामानवाला आवश्यक असलेले असे सर्व गुण त्यांचे ठाई एकवटलेले आहेत.

कॉस्मा द गार्दा या पोर्तुगीजाने महाराजांचे एक चरित्र लिहिले असून त्यात महाराजांनी मुक्तकंठाने स्तुती केली आहे.

फ्रेंच गव्हर्नर मार्टिन याने लिहून ठेवले आहे. की, हिंदुस्थानातील नाव घेण्यासारख्या अशा थोर विभुतीमध्दे शिवाजीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, हे नि:,संशय.

तर व्हिएतनामचा सम्राट हो-चि-मिन्ह यांच्या मृत्यूनंतर त्याच्या थडग्यावर जे वाक्य कोरले आहे ते असे ‘हिंदुस्थानचा राजा शिवाजी याच्या गनिमी काव्याच्या युध्दशैलीने मी माझ्या राज्याला स्वातंत्र्य मिळवून दिले.’

   
  १७) रायगड शकावली
   
  ११ वे शतक - यादवांची सत्ता गडावर मराठे पाळेगार.
१२ वे शतक - मराठे पाळेगारांनी विजयनगर अथवा. अनागोंदीचे स्वामित्व स्विकारले.
इ.स. १४३६ - अल्लाउद्दीन शहा बहामनी २रा याचे मराठे पाळेगारांनी स्वामित्व स्विकारले.
इ.स. १४७९ - अहमद नगरच्या निजामशहाकडे गड ताब्यात शिर्के येथील देशमुख.
इ.स. १५५८ - अदिलशहाची अधिसत्ता.
इ.स. १६१७ - निजामशाही अधिकारी म्हणून आागा हाजी याकुद इस्तंबोली हा हवालदार.
इ.स. १६१८ - आदिलशाहीच्यावतीने हैबतखानाचा रायरीवर हल्ला, लुट व सबंध खोरे काबीज, हवालदारी राजे पतंगराव याजकडे.
इ.स. १६२१ - राजे पतंगराव यांची बदली होवुन मलिक जमरुत गडाचा हवालदार.
इ.स. १६२४ - निजामशाही अधिकारी म्हणून इब्राहिमखान हा रायरीचा व बारा मावळांचा हवालदार.
६ मे १६३६ - बादशहा शहाजहान याची निजामशाहीवर स्वारी व विजय, मोगल राजधानी पासून दुर असलेला हा अवघड मुलूख सांभाळणे कठीण म्हणून अदिल शहाशी तह. रायरीचा प्रत्यक्ष ताबा चंद्रराव मोऱ्यांकडे.
६ मे १६५६ - शिवरायांनी रायरी जिंकला.
४ सप्टेंबर १६५६ - रायरी हे नांव बदलू रायगड हे नामकरण.
इ.स. १६५७-५८ - आबाजी सोनदेव व रामराव प्रभू यांची नेमणूक
११ डिसेंबर १६६७ - पोर्तुगीज वकील गोंझालो मार्टिनशी वाटाघाटी.
इ.स. १६७० - गडाची दुरुस्ती, व नवीन बांधकाम महाराजांचे कायमस्वरुपी वास्तव्य.
मे १६७२ - इंग्रज वकील उस्टिक रायगडावर.
२१ जुलै १६७२ - डच वकील आब्राहम लेपेकर रायगडावर.
३ जून १६७३ - इंग्रज वकील थॉमस निकल्स रायगडावर.
२२ मे १६७४ - हेन्री ऑक्झेंडनचे आगमन व १३ जुन पर्यंत मुक्काम
२९ मे १६७४ - महाराजांची समंत्रक मुंज.
३० मे १६७४ - सोयराबाई साहेबांशी समंत्रक विवाह.
६ जून १६७४ - जेष्ठ शु. १३ शिवराज्याभिषेक.
१७ जून १६७४ - राजमाता जिजाऊसाहेबांचे पाचाड येथे निधन.
२४ सप्टेंबर १६७४ - अश्विन शु. ५ (ललितापचंमी) दुसरा राज्याभिषेक
२४ सप्टेंबर १६७५ - इंग्रजवकील सॅम्युअल ऑस्टिन गडावर.
७ सप्टेंबर १६७५ - राजाराम साहेबांची मुंज.
१५ मार्च १६८० - राजाराम साहेबांचे लग्न.
३ एप्रिल १६८० - महाराजांचे महाप्रस्थान.
२१ एप्रिल १६८० - राजाराम साहेबांचे मंचकारोहण.
१८ जून १६८० - संभाजी राजांचे पन्हाळयाहून आगमन.
२७ जून १६८० - शिवपत्नी पुतळाबाई साहेब सती.
२० जुलै १६८० - संभाजी राजांचे मंचकारोहण.
२७ ऑक्टोबर १६८० - मोरोपंत पिंगळे यांचे देहावसन.
१६ फेब्रुवारी १६८१ - संभाजी राजांचा विधियुक्त राज्याभिषेक.
ऑगस्ट १६८१ - संभाजी राजांवर विषप्रयोगाचा प्रयत्न.
९ फेब्रुवारी १६८१ - राजाराम महाराजांचे मंचकारोहण.
२५ मार्च १६८९ - झुल्फिकार खानाचा रायगडाला वेढा.
५ एप्रिल १६८९ - राजाराम महाराज रायगडावरुन निसटले.
३ नोव्हेंबर १६८९ - गड मोगल्यांच्या हाती - इस्लामाबाद नामकरण.
इ.स. १६९० - मोगलांतर्फे गडाचा ताबा सिद्दीकडे.
६ जून १७३३ - रायगड पेशव्यांनी घेतला, ताबा पंतप्रतिनिधींकडे.
१८ मार्च १७७३ - रायगड पेशव्यांच्या ताब्यात.
जून १७९६ - नाना फडणविसांचा मुक्काम व गडाची डागडुजी.
इ.स. १८०२ - दुसऱ्या बाजीरावाचे गडावर वास्तव्य.
२ फेब्रुवारी १८१० - रायगड-माची येथे दुसऱ्या बाजीरावाचा मुक्काम.
इ.स. १८१६ - रायगड इंग्रजांकडे परंतु लगेच त्याचा ताबा पेशव्यांकडे, पेशवे गड सोडिनाच.
२५ एप्रिल १८१८ - इंग्रजांचा रायगडाला वेढा.
४ मे १८१८ - खुब लढयावर इंग्रजांचा भडिमार.
६ मे १८१८ - पोटल्याच्या डोंगराकडून केलेल्या भडिमाराने गडावर जाळपोळ.
१० मे १८१८ - रायगडावरील स्वातंत्र्यसुर्य मावळला तह होवुन गड इंग्रजांकडे.
   
Site Designed and Maintain by Net Solutions